Baby Falling Funny Viral Video: सोशल मीडियाच्या जगात लाइक्स मिळविण्याच्या शर्यतीत लोक अगदी कोणत्याही थराला जात असतात. फक्त एक व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याच्या आशेने लोक लहान मुलांकडूनही आश्चर्यकारक पराक्रम करून घेतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये एका लहान मुलाला असं काही करताना दाखवण्यात आलं आहे की जे पाहून नेटिझन्स सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगा छतावरून खाली उतरण्यासाठी शिडीची मदत घेत आहे आणि खाली उभे असलेले कुटुंबीय त्याचा व्हिडीओ बनवताना दिसून येत आहेत. शिडीवरून खाली उतरत असताना या चिमुकल्याचा पाय पायऱ्यांवरून थोडा घसरला आणि तो पायऱ्यांवरून खालच्या दिशेने घरंगळत जमिनीवर पडला. जेव्हा हा चिमकला शिडीच्या पायऱ्यांवरून घरंगळत टप्प्या टप्प्याने जमिनीवर येतो तेव्हा तो चालायला लागतो आणि एक स्त्री त्याच्याजवळ येते. या व्हिडीओमध्ये सुरूवातीला हा चिमुकला शिडीवरून खाली पाय घसरून पडला की काय, असा भास होऊ लागतो. पण तो चुकून घसरलेला नसून केवळ एक स्टंट असल्याचं व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येतं.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवरी-नवरदेवावर पैसे उडवण्याचा उत्साह नडला, थेट नवरदेवाच्या मांडीवर जाऊन पडला

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : माशाच्या तोंडात सिरिंज टोचल्यानंतर शेकडो पिल्ले बाहेर पडली! असं दृश्य तुम्ही कधीच पाहिलं नसेल!

या व्हिडीओला इंटरनेटवर खूप पसंती मिळत आहे, परंतु काही लोक व्हिडीओ बनवणाऱ्या लोकांच्या आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या बेजबाबदार वृत्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या चिमुकल्याचा जीव धोक्यात घालून त्याला शिडीच्या साहाय्याने खाली यायला कसं काय सोडलं, असं अनेकांचं म्हणणं आहे. तर त्याच वेळी काही लोकांना या मुलाची ही स्टाईल खूप आवडली आहे आणि ते त्याला स्पायडरमॅन म्हणत आहेत.

आणखी वाचा : राणू मंडलने गायलं ‘Kacha Badam’ गाणं, VIRAL VIDEO पाहिल्यानंतर लोक म्हणाले, ‘सगळा मूड खराब केला’

हा व्हिडीओ ghantaa नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहून लोक सुन्न झाले आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत १.७ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख ८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. काही लोकांना चिमुकल्याचा हा स्टंट आवडत असला तर काही लोकांनी मात्र यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of small child who get down from stairs in style sensational makes internet crazy prp