Viral video: मुंगूस आणि साप यांच्यातील शत्रुत्व सर्वांनाच माहीत आहे. हे दोन प्राणी एकमेकांच्या समोर आले की, परस्परांशी भिडणार हे नक्की. मुंगूस आणि सापाची अशीच कडवी झुंज पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. लोकांना इथे वाईल्ड लाईफ संबंधीत देखील अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो साप आणि मुंगूस यांच्याशी संबंधीत आहे. साप आणि मुंगूस यांच्यातील वैराबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकलं असेलच. ते दोघेही कधीच एकत्र राहू शकत नाहीत, म्हणूनच तर बऱ्याचदा कोणा दोन व्यक्तींमध्ये सारखी भांडणं झाली तरी देखील लोक त्यांना साप आणि मुंगूस अशी उपमा देतात. हा व्हायरल होणारा व्हिडीओ देखील दोघांच्या भांडणाचाच आहे. यामध्ये नेमकं कोण जिंकलं आणि कोणाचा पराभव झाला हे पाहुया.

भर रस्त्यात मुंगूस आणि सापाचा हा संघर्ष सुरू होता. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, रस्त्याच्या कडेला एक साप फणा काढलेला दिसत आहे. काही वेळानं एक मुंगूस रस्ता ओलांडून त्याच्याकडे जातो. मुंगूस जवळ येताच साप त्याच्यावर हल्ला करतो. साप दोनदा असं करतो, पण त्याच्या प्रयत्न कामी येत नाही. मुंगूसावर काहीही परिणाम होत नाही. मुंगूस इकडे तिकडे सापाच्या बाजूने फिरतं आणि योग्य संधी साधत सापावर घाव घालतो. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुंगूस सापावर वेगाने हल्ला करतो, पण साप लगेच प्रत्युत्तर देतो. मुंगूस सापाच्या शेपटीला जोरदार चावतो, पण साप वेळेत आपली शेपटी दूर करतो. व्हिडिओ पाहिल्यास, साप आणि मुंगूस यांच्यातील लढाईत मुंगूस सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मुंगूस सापावर भारी पडत आहे. पण साप चपळाईने स्वतःचा बचाव करण्यात यशस्वी होतो. शेवटी, साप आणखी कोणताही हल्ला न करता शांतपणे तिथून निघून जातो.  हा व्हिडीओ आतापर्यंत खूप लोकांनी पहिला आहे आणि त्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होतेय.

पाहा व्हिडीओ

@AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. व्हिडीओवर अनेक वापरकर्ते कमेंट करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. काही वापरकर्त्यांनी सापाला गरीब म्हटले तर काहींनी मुंगूस धाडसी म्हटले आहे.