Snake Bite in Bihar : सर्पदंश झाल्यानंतर वेळेत उपचार न मिळाल्यान अनेकांचा जीव गेला आहे. तसंच, कोणत्या सापाने दंश केल्याचं हे न कळल्यामुळेही उपचारांअभावी जीव गेल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. असाच प्रकार बिहारमध्ये घडला आहे. बिहारमधील भागलपूरमध्ये एका व्यक्तीला साप चावल्यानंतर त्याने जे केलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला.

जगातील सर्वांत विषारी सापांपैकी एक असलेल्या रसेल वाइपरने बिहारमधील भागलपूरमध्ये एका माणसाचा चावा घेतला. सर्पदंश झाल्याचं कळताच प्रकाश मंडल या माणसाने विषारी सापाला पकडले आणि गळ्यात टांगून रुग्णालयात घेऊन आला. रुग्णालयात आल्यानंर प्रकाश मंडल याच्यावर आपत्कालीन विभागात तातडीने उपचार करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असतानाही त्याच्या मानेभोवत तो साप होताच.

Rivers all over the world were drained
जगभरातील नद्यांचे नाले झाले, कारण…
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
marburg virus
जगातील सर्वांत घातक विषाणूमुळे आतापर्यंत १२ लोकांचा मृत्यू; काय आहे मारबर्ग व्हायरस? त्याची लक्षणं काय?
Mark-Zuckerberg Top 10 richest people in the world
Mark Zuckerberg : ‘मेटा’चे सीईओ मार्क झुकरबर्ग बनले जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती, जेफ बेझोस यांना टाकलं मागे; संपत्ती कितीने वाढली?
What are cities doing with land reclaimed from garbage dumps under Swachh Bharat Mission
Swachh Bharat Mission: स्वच्छ भारत मिशन मोहिमेच्या अंतर्गत कचऱ्याच्या ढिगाऱ्यांपासून मुक्त झालेल्या जमिनीचा वापर कसा केला जातोय?
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
According to chess player arjun Erigesi success comes from not thinking about results
दडपण झुगारणे महत्त्वाचे! निकालांबाबत विचार न केल्याने यश; बुद्धिबळपटू एरिगेसीचे मत
Cherrapunji temperature, Cherrapunji records highest temperature,
चेरापुंजीमध्ये इतिहासातील उच्चांकी तापमान; जाणून घ्या, तापमान वाढ का झाली

तो सरपटणारा प्राणी त्याच्या गळ्यातून निसटला तर तो रुग्णलयातील इतर रुग्णांचा चावा घेईल यामुळे काही लोक त्यांच्यापासून दूर होते. प्रकाश मंडळ याने मानेभोवत साप लटकवून एका हाताने सापाचं तोंड दाबलं होतं. त्यामुळे या व्यक्तीला एका निर्जन स्थळी घेऊन जाणं गरजेचं होतं. त्यामुळे त्याला एका ठिकाणी नेण्यात आलं. तिथे गेल्यानंतर त्या व्यक्तीने मानेभोवती गुंडाळलेला साप हातात पकडला आणि त्याच्याबरोबरच फरशीवर झोपला.

हेही वाचा >> ट्रेनमधील स्टंट आला अंगाशी, VIDEO पाहून उडेल थरकाप; पाहा नेमकं काय झालं?

अखेर उपचारांसाठी त्याने सापाला दिलं सोडून

सापाला पकडून ठेवल्यास उपचार करण्यास अवघड जाईल, असं त्याला सांगितल्यानंतर त्याने सापाला सोडले. हा साप अत्यंत विषारी वर्गातील होता. भारतापासून तैवान आणि जावापर्यंतच्या खुल्या देशात तो आढळतो. मानवी संपर्क कमी असलेल्या शेतजमिनींमध्ये हे साप आढळतात.