Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही आपल्याला पोट धरून हसवणारे तर काही थक्क करणारे असतात, असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही आजोबा मनसोक्त गरबा खेळताना दिसत आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. ‘हौसेला मोल नसते’ ही म्हण मराठी भाषेत प्रचलित आहे. परंतु ‘हौसेला वय नसतं’ हे या आजोबांनी सिद्ध केलं आहे.

आयुष्यातील उतार वयात वृद्ध लोक बराचसा वेळ हा आपल्या नातवंडात घरीच घालवणे पसंत करतात. पण काही अवलीया शेवटच्या क्षणापर्यंत आपं आयुष्य मनसोक्त जगतात. या व्हिडीओमध्ये दोन आजोबा कशाचीही चिंता न करता मनसोक्त गरब्याच्या तालावर थिरकताना दिसत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळे अनुभव घेतले असणारी वृद्ध मंडळी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात अशी उत्साही दिसली की बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटतं.

Pahile Na Mi Tula Marathi Natak Preview
नाट्यरंग : पाहिले न मी तुला – दृष्टिकोनातील फरकाचा लोच्या
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Ashokan edict in Dhauli
बौद्ध तत्त्वज्ञान जनमानसात पोहोचवणाऱ्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; पाली आणि प्राकृत का आहेत महत्त्वाच्या?
How important is sevens table in life | Inspirational Video
आयुष्यात सातचा पाढा किती महत्त्वाचा आहे! प्रत्येक आकडा सांगतो वयाचे महत्त्व, VIDEO एकदा पाहाच
Akshay Kumar's Health and Fitness Mantra: Balance Over Pressure
Akshay Kumar : “स्वत:वर प्रेशर घेऊन मला आरोग्य खराब करायचे नाही…” अक्षय कुमारसाठी आरोग्य आणि फिटनेस का महत्त्वाचे?
Electric bike overcharging Be careful
इलेक्ट्रिक बाईक जास्त चार्ज करता? वेळीच व्हा सावध, नाहीतर निर्माण होईल मोठी समस्या
World Tourism Day 2024, Tourism,
पर्यटन म्हणजे निव्वळ उपभोग नव्हे, समृद्ध होणे आणि तेथील समृद्धी जपणेही महत्त्वाचे!
According to chess player arjun Erigesi success comes from not thinking about results
दडपण झुगारणे महत्त्वाचे! निकालांबाबत विचार न केल्याने यश; बुद्धिबळपटू एरिगेसीचे मत

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वृद्ध मंडळींचा गृपवर मैदानात गरबा खेळत आहेत. यावेळी सगळ्या आजोबांनी धोतर नेसलं असून डोक्यात पांढरी टोपी घातली आहे. दांडिया आणि गरब्याची गाणी सुरू असतात या गाण्याच्या ठेक्यावर काही आजोबा दांडिया खेळत आहेत. एका तालात आणि एका ठेक्यावर सर्व आजोबा दांडिया खेळत आहेत. आजू बाजूला असलेल अनेक नागरिक त्यांना पाहत असून हा व्हिडीओ पाहून तुम्हीही आजोबांचं कौतुक कराल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> सूरज चव्हाणच्या आगमनाला गावात खतरनाक नियोजन; २०० किलोचा हार १२ डिजे अन्..सुरजच्या घराबाहेरचा VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबात माहिती मिळू शकलेली नाही. व्हिडीओ इन्स्टाग्रामवर marathi_epic_jokes या पेजवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तो काही क्षणांत व्हायरल झालाय. लोक या व्हिडीओला आवडीने पाहत असून लाईक आणि शेअर करत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर नेटकरी मजेदार कमेंट्स करत आहेत. या वयातदेखील आजोबांचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर “किती जगला यापेक्षा कसा जगला हे म्हत्त्वाचे” असे दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले आहे.