जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही मिळवायचं असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका, कारण कोणत्याही कामात यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास असणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास नसतो, तो त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्याआधीच अडखळतो, तर स्वतःवर विश्वास असेल तर तो माणूस हसत हसत प्रत्येक अडथळे पार करतो. कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं किती महत्त्वाचं आहे, याची साक्ष देणारा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.
हा व्हिडीओ व्हीलचेअरवरून फूड डिलिव्हरीचं काम करणाऱ्या अपंग व्यक्तीचा आहे. पाय नाहीत म्हणून काय झालं, राबण्यासाठी हात तर आहेत, असा विचार करून हा झोमॅटो फूड डिलिव्हरी बॉय सध्या सोशल मीडियावर चर्चेत आलाय. व्हीलचेअरवर बसून हा झोमॅटो डिलिव्हरी बॉय घरोघरी फूड डिलिव्हरी करण्याचं काम ते करत आहेत. जे लोक एकेकाळी या व्यक्तीकडे दयेने पाहत होते, आज तेच लोक या झोमॅटो फूड डिलिव्हरी बॉयकडे कौतुकाने पाहत आहेत. हा फूड डिलिव्हरी बॉय पायाने अपंग असला तरी तो स्वतःच्या पायावर उभा आहे आणि स्वतःची जबाबदारी घेत आहे. डिलिव्हरी बॉयचा हा व्हिडीओ सर्वांच्याच मनाला भिडणारा आहे. काहीजण भावूकही होत आहेत.
आणखी वाचा : “आयुष्य सोपं नाही…!”, ट्रॅफिकमध्ये भर पावसात भिजत होता स्विगी डिलिव्हरी बॉय, पाहा VIRAL VIDEO
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय व्हीलचेअरवर बसून त्याच्या ठिकाणाकडे जात आहे. व्हीलचेअरमध्ये मोटर असते, ज्यामुळे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आरामात जाऊ शकते. आत्तापर्यंत तुम्ही डिलिव्हरी एजंटला सायकल, बाईकवरच खाद्यपदार्थ पोहोचवताना पाहिले असेल. पण जेव्हा लोकांनी या व्हीलचेअर फूड डिलिव्हरी एजंटला पाहिले तेव्हा ते भावूक झाले. मात्र, बहुतांश लोक या डिलिव्हरी बॉयचे खूप कौतुक करत आहे. चला तर मग हा व्हिडीओ पाहूया.
आणखी वाचा : जीवाची पर्वा न करता दलदलीत उतरून काळवीटाच्या पिल्लाचा जीव वाचवला! पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : कोणतंही सुरक्षा साधन न वापरता डोंगर चढतात हे भिक्खू, हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
या व्हायरल व्हिडीमधल्या अपंग फूड डिलिव्हरी बॉयचं नाव गणेश गणेश मुरुगन असं असून ६ वर्षांपूर्वी एक अपघातात त्याच्या पाठीच्या कण्याला मोठी दुखापत झाली होती. गणेशला ट्रकने धडक दिल्याने तो अधू झाला. IPS अधिकारी दिपांशू काब्रा यांनी त्याची कहाणी ट्विटरवर शेअर केली होती. त्याची टू-इन-वन व्हीलचेअर, आयआयटी मद्रास येथील एका स्टार्ट-अपने विकसित केली आहे, सहज वाहतूक करण्यासाठी मोटार देखील बसवण्यात आली आहे.
आणखी वाचा : निष्काळजीपणाचा कळस! विमानातल्या जेवणात सापाचं डोकं, पाहा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत आहे. काही लोकांनी तर लिहिलंय की हे आयुष्य माणसांना काय काय करायला लावेल सांगता येत नाही. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर groming_bulls_ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन लिहीली आहे. ‘प्रेरणाचे सर्वात परिपूर्ण उदाहरण’ असं या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलंय. हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर जवळपास १ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख ४६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केले आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.