सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे मजेदार व्हिडीओ अपलोड होत असतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर काही क्षणात हेडलाइनमध्ये झळकतात. आता पुन्हा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमधल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक समूह गीत म्हणण्याची विनंती केली, पण त्यानंतर विद्यार्थ्यांचा एक ग्रूप स्टेजवर चढला आणि जे काही दिसून येतं, पाहून तुम्ही अक्षरशः पोट धरून हसाल. ज्या पद्धतीने त्यांनी शिक्षकांच्या विनंतीवरून परफॉर्मन्स दिला तो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही, हे मात्र नक्की.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, काही मुले वाद्य घेऊन स्टेजवर चढतात आणि नंतर जे गाणं गातात ते फारच मजेदार आहे. शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना समूह गीत गाण्याची विनंती केली होती. त्यावरून या विद्यार्थ्यांनी माईक हातात घेऊन ‘सैया जी दिलवा मांगले गमछा बिहाई के’ हे भोजपुरी गाणं गायला सुरूवात केली. आता हा व्हिडीओ कोणत्या कार्यक्रमादरम्यानचा आहे याची अद्याप कोणतीही माहिती कळू शकलेली नाही मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या व्हिडीओवर प्रतिक्रियाही येत आहेत.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
असा व्हिडिओ पाहिला नसेल
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे. bhutni_ke_memes नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. “ही पोस्ट रंगीबेरंगी होळीसारखी सुंदर आहे.” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला पाच हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.
आता या व्हिडीओवर लोकांच्या भरभरून प्रतिक्रिया देखील येत आहेत. हा व्हिडीओ पाहणं जितकं मजेदार आहे त्याहून मजेदार या व्हिडीओवरील लोकांच्या कमेंट्स आहेत. एक व्यक्ती लिहिते, ‘भाऊ, जुन्या आठवणी ताज्या झाल्या.’ दुसरा युजर लिहितो, ‘मजा आली.’