काही विद्यार्थांना तहान लागली की विहिर खणण्याची सवय असते. म्हणजेच परिक्षा डोक्यावर आली की अभ्यासाला सुरुवात करायची. परंतु अत्यंत कमी वेळात अभ्यास होत नाही व नापास होण्याची भीती वाटू लागते. अशा परिस्थितीत मग हे विद्यार्थी कॉपी करण्याचे विविध मार्ग शोधू लागतात. सध्या अशाच एका कॉपी बहाद्दर विद्यार्थ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो कॉपी बहाद्दरांचा मास्तरच निघाला.
प्रत्येक वर्गात अशी काही मुलं असतात, जी केवळ कॉपीच्या जोरावर परीक्षेला बसतात. ते वर्षभर अभ्यास करत नाहीत आणि कॉपीच्या माध्यमातून परीक्षा उत्तीर्ण होतील, असा विचार करतात. देशभरातून कॉपीच्या अनेक घटना रोजच बातम्यांच्या हेडलाईन बनतात. पण शिक्षकही आता विद्यार्थ्यांच्याही एक पाऊल पुढे असतात. आता यासंबंधीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये परीक्षेपूर्वी विद्यार्थी कॉपी घेऊन परीक्षा हॉलमध्ये पोहोचले नाहीत ना, याची तपासणी केली जात आहे. काही विद्यार्थी चतुराईने कॉपी घेऊन होते. मात्र त्यांची ही आयडिया काही कामी आली नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होऊ शकतो.
आणखी वाचा : सिनेमातला सीन नव्हे, रिअल लाइफ मर्दानीचा खरा VIDEO VIRAL; ७३ वर्षीय आजीने एकटीने चोराला पडकलं
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अनेक विद्यार्थी रांगेत उभे असून त्यांची कॉपी तपासली जात असल्याचं दिसून येत आहे. चेकर समोर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्यावर तो ताठ उभा राहतो. मग ते पाहून चेकर त्याची पॅन्ट तपासतो, त्याला तिथेही काही मिळत नाही. सरतेशेवटी त्याने पँटच्या सीलमध्ये रबराच्या सहाय्याने अनेक कॉपी बांधल्याचं दिसून आलं. विद्यार्थ्याच्या या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
आणखी वाचा : बापरे! अचानक हवेत उडू लागला हा व्यक्ती आणि समुद्रावर घिरट्या घालू लागला, पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : प्रेमासाठी काय पण! सुटकेसमध्ये गर्लफ्रेंडला टाकून होस्टेलबाहेर घेऊन जात होता, पाहा हा VIRAL VIDEO
पुढे या व्हिडीओमध्ये चेकर असं काहीतरी बोलताना दिसून येतोय. “त्याला वाटले असेल की तो संपूर्ण सागरच घेऊन जाऊ, त्याला हवं तितकं पाणी प्यायला” असं तो चेकर बोलताना दिसतो. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ memewalanews च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. नेटिझन्स नेहमीप्रमाणे या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
आणखी वाचा : फुल टाईम जॉब करणारी ही बेघर महिला कारमध्येच राहते, जिममध्ये अंघोळ करते, पाहा हा VIRAL VIDEO
आता हा व्हिडीओ मनोरंजनाच्या उद्देशाने बनवण्यात आला आहे की तो खऱ्या घटनेशी संबंधित आहे, यावर अद्याप कोणताही शिक्कामोर्तब झालेला नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.