Viral Video Of Swan Make Beautiful House By Spreading Her Wings : मानवाप्रमाणेच प्राण्यांमध्येही आई व मुलांचे नाते हे खास असते. मानवाप्रमाणेच या आई आपल्या मुलांबरोबर खूप वेळ घालवतात, त्यांच्या खाण्यापिण्यासाठी इकडे-तिकडे फिरतात, ऊन, पाऊस, उन्हाळ्यापासून पिल्लाचे संरक्षण करतात. त्यांच्याबरोबर प्रत्येक सुखदुःखात नेहमी बरोबर असतात. तर आज असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये हंस आपल्या पिल्लांना पाण्यात, आपल्या पंखाच्या संरक्षणासह फेरफटका मारताना दिसून आला आहे. नक्की काय आहे या व्हायरल व्हिडीओत खास चला पाहू…

व्हायरल व्हिडीओत कुठला आहे अद्याप याची माहिती कळू शकलेली नाही. पण, हंस तिच्या पिल्लांबरोबर पाण्यात फिरत आहे. हंसाने आपल्या पिल्लांना पंखाखाली घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता की, हंसाची चार पिल्ल पाठीवर बसली आहेत आणि हंसाने तिच्या पंखांसह त्यांना घेरलं आहे. पक्षी पिल्लांसाठी एक-एक काठी गोळा करून जसं घरटं बांधतो. त्याचप्रमाणे अगदी तिने पंखांसह सुंदर घरटं बनवलं आहे. हंसाने पिल्लांसाठी बनवलेलं सुंदर घर व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Vineeta Singh says Ek crore to aap ek ghante mein kama lete ho (1)
Video: “तासाला १ कोटी कमावता, मग इथे…” ‘शार्क टँक’मध्ये आलेल्या प्रसिद्ध युट्यूबरला विनीता सिंहचा सवाल अन्…
Shocking video Shark attacks crocodile carcass australia terrifying scene video goes viral on social
VIDEO: बापरे! मगरीच्या शिकारीसाठी शार्क मासा चक्क समुद्र किनाऱ्यावर आला; अन् १० सेकंदात जे झालं ते पाहुन तुमचाही उडेल थरकाप
Lion Cub Learns Why You Dont Bite On Dads Tail funny Animal Video goes Viral on social media
VIDEO: शेवटी बाप बाप असतो! झोपलेल्या सिंहाची पिल्लानं चावली शेपटी; पुढे जे घडलं ते पाहून तुम्हीही व्हाल थक्क
Paaru
Video : “देवा, या जंगलात मी…”, जंगलात हरवलेल्या पारूवर संकट येणार? आदित्य पारूला वाचवू शकणार का? मालिकेत ट्विस्ट
Shocking video Flying Drone Blasts Into A Crocodiles Mouth While It Is Eating Animal Video Viral
“म्हणून जास्त हाव करू नये” मगरीनं खाल्ला उडणारा ड्रोन; पण तेवढ्यात तोंडातच बॅटरी फुटून झाला ब्लास्ट, VIDEO पाहून सांगा चूक कुणाची?
Muramba
Video: “हिला रमा बनवणं अवघड…”, अक्षयसाठी मॉडर्न माही रमा बनणार का? ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो

हेही वाचा…ऑफिसनंतर झाली भेट, तुरुतुरु चढू लागली पायावर अन्… VIDEO तून पाहा मांजरीच्या पिल्लाने कसं निवडलं आपल्या मालकाला

व्हिडीओ नक्की बघा…

हंसाने बनवलं पंखांचं घर :

संकटाच्या वेळी आई आपल्या मुलांवर मायेचा पदर ओढते आणि त्यांचे संरक्षण करते. याच उत्तम उदाहरण आज व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळालं आहे. पाण्यात पिल्ले पडू नयेत म्हणून की काय हंसाने सुरक्षितपणे आपल्या पिल्लांना पंखाखाली घेतलं आहे. आईच्या पाठीवर बसून चार पिल्ले आराम करत आहेत आणि हंसाचे पंख त्यांना संरक्षण देत आहे. आईच्या पंखांचे संरक्षण मिळाल्यामुळे पिल्ले सुद्धा अगदी आरामात बसली आहेत आणि पाण्यात तरंगण्याचा आनंद लुटत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @uzay.bilim.teknoloji या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओतील हे दृश्य पाहून नेटकरी सुद्धा भारावून गेले आहेत. काही जण या अद्भुत दृश्याचे कौतुक, तर काही जण भावूक होत कमेंट करताना दिसून आले आहेत. तर एका युजरने कमेंट केली आहे की, ‘यापेक्षा सुंदर आणखीन काय असू शकतं’. आतापर्यंत प्राण्यांचे जंगलातील अनेक्क व्हिडीओ तुम्ही पहिले असतील. पण, हा व्हिडीओ सगळ्यात वेगळा आहे ; जो तुमचेही मन नक्कीच जिंकेल.

Story img Loader