आई-वडिलांसारखेच शिक्षक हे आपल्या गुरुस्थानी असतात. शिक्षक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवतात. काय चूक काय बरोबर हे शिकवण्याबरोबरच आयुष्याची गणितं कशी सोडवायची ते शिकवतात. ज्ञानाचा सागर असलेले आपले शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करत असतात.

सोशल मीडियावर दर दिवसाला अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आतापर्यंत आपण अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत कविता शिकवतानाचे, मुलांना डान्स शिकवण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिलेच असतील. पण, सध्या शिक्षकाचा एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात शिक्षक पावडर कशी लावायची हे शिकवतायत.

A student Missed school for two days and watching tv at home
शाळेला दोन दिवस दांडी मारुन घरी निवांत टिव्ही पाहत होता विद्यार्थी, अचानक शिक्षक आले; पाहा VIDEO, पुढे काय घडले…
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Groom funny dance at baarat video went viral on social medi
मुलांनो असा डान्स येत असेल तरच लग्न करा! वरातीत नवरदेवाने धरला ठेका, VIDEO पाहून पोट धरून हसाल
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Couple dance video husband wife dance in wedding on marathi song
VIDEO: आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे! नवरा बायकोनं असा डान्स केला की सगळे नातेवाईक पाहतच राहिले
Indias most expensive film flopped after row over same sex kiss
दोन अभिनेत्रींमधील किसिंग सीनमुळे वाद, दिग्दर्शकाचं करिअर संपलं; तब्बल १० कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले फक्त…
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Little boy driving pick up tempo shocking video viral on social media
तुम्हीच सांगा चूक कोणाची? एका हातात स्टेअरिंग अन्…; लहान मुलगा चालवतोय टेम्पो, पाहा थक्क करणारा VIDEO

हेही वाचा… “हे फक्त शेतकरीच करू शकतो”, हिरवी साडी नेसवली अन् फुलांची सजवलं, चक्क गाईसाठी केला डोहाळ जेवणाचा थाट

शिक्षकाने शिकवलं बचतीचं शिक्षण

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. या व्हिडीओमध्ये एका शाळेत शिक्षक अगदी वेगळ्या पद्धतीने मुलांची शिकवणी घेताना दिसत आहे. पावडर कशी लावावी याबद्दल हे सर शिकवताना दिसतायत. अगदी हातात पावडर घेऊन त्याचं प्रात्यक्षिक करून कशी पावडर लावू नये आणि कशी पावडर लावावी याबद्दल सविस्तर सरांनी या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @tanajidhumal333 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “बचतीचे शिक्षण” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १.९ मिलियन व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… आगरी-कोळी गाण्याचा नादच भारी! मुंबई लोकलमध्ये महिलेचा भन्नाट डान्स, VIDEO पाहून कराल कौतुक

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “त्यामुळे पोरांचा सिलॅबस संपत नाहीय.” तर दुसऱ्याने “ही मुलं भाग्यवान आहेत” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “पावडरच का लावायची आहे पण.” तर “सर खूप सुंदर, शिक्षण कोणत्याही शाळेत मिळेल, पण दैनंदिन जीवनातल्या बारीक गोष्टी कशा हाताळायच्या हे खूप महत्त्वाचं असतं, जे लाख रुपयांची फी भरूनपण शहरातल्या शाळांमध्ये आज शिकवत नाही, छान प्रयत्न आहे हा तुमचा”, अशीदेखील कमेंट एकाने केली.

तसंच “जिल्हा परिषदेच्या शाळेचं सौंदर्य”, “सरांचा शिकवण्याचा पॅटर्नच वेगळा”, “हे फक्त मराठी शाळेतच पाहायला मिळतं”, अशाप्रकारच्या अनेक कमेंट्स व्हिडीओला आल्या आहेत.

Story img Loader