पोलीस स्टेशन म्हटलं की तिथे चोरी, दरोडा, हत्या, मारहाण अशा अनेक तक्रारींसाठी लोक जात असतात. पण मध्य प्रदेश पोलिसांकडे चक्क एक तीन वर्षाचा चिमुरडा तक्रार करण्यासाठी आला होता. बरं ही तक्रार इतर कोणी नाही, तर तो आपल्याच आईविरोधात करण्यासाठी आला होता. इतकंच नाही, तर आपल्या आईला अटक करा अशी मागणीही त्याने पोलिसांकडे गेली. निरागस मुलाची ही तक्रार ऐकून पोलिसांनाही हसू आवरत नव्हतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या आईवर चिडलेल्या मुलाने वडिलांना आपल्याला पोलीस ठाण्यात घेऊन जायला सांगितलं. आपली आईने कँडी चोरल्याने आणि कानाखाली मारल्याने त्याला आईविरोधात तक्रार करायची होती. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – जे बोलला तेच झालं! ‘चल मरेंगे’ म्हणत हायवेवर ताशी ३०० च्या वेगाने मित्र पळवत होते कार, इतक्यात समोर कंटेनर आला अन्…

सद्दाम असं या चिमुरड्याचं नाव आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत चिमुरडा महिला पोलीस अधिकाऱ्याकडे आपली तक्रार नोंदवत असल्याचं दिसत आहे. “अम्मीने माझ्या कँडी चोरल्या, तिला जेलमध्ये टाका,” अशी मागणी पोलीस उपनिरीक्षक प्रियांका नयाक यांच्याकडे केली.

मुलाची ही मागणी ऐकून प्रियांका नायक यांनी हसू आवरत नव्हतं. त्यांनीही त्याला प्रश्न विचारत सगळं काही लिहून घेत आपण तक्रारीची नोंद करत असल्याचं दाखवलं. नंतर सद्दामनेही त्या कागदावर स्वाक्षरी घेतली. प्रियांका नायक यांनीही त्याला तुझ्या आईला लवकरच अटक करु असं खोटं आश्वासन देत त्याला नाराज केलं नाही.

सद्दाम कँडी मागतो तेव्हा त्याची आई प्रेमाने गाल ओढते असं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. यामुळे तो चिडला आणि मला पोलिसांकडे घेऊन जा म्हणून सांगू लागला असंही त्यांनी सांगितलं आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनीही व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून मुलाशी संपर्क साधला. आपण दिवाळीला तुला सायकल आणि चॉकलेट घेऊन येऊ असं आश्वासनही त्यांनी सद्दामला दिलं आहे.