जेव्हा लोकांना पार्टी करण्याची इच्छा होते, तेव्हा एक तर ते मित्र किंवा कुटुंबाबरोबर घरीच प्लॅन बनवतात. नाहीतर क्लब किंवा पबला जाऊन पार्टीचा आनंद लुटतात. पण तरुणाईसाठी पब, क्लबमधील पार्टीची मज्जा काही औरच असते. झगमगीत लायटिंगमध्ये मोठ्या आवाजातील म्युझिकवर नाचण्या गाण्याचा आनंद घेता येतो, याशिवाय खाण्यापिण्याच्या इच्छाही पूर्ण करता येतात. पण, यासाठी लोक योग्य प्लॅन करून क्लबमध्ये जातात. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, जिथे चक्क ट्रेनमधून प्रवास करता करता पार्टीचा मनमुराद आनंद लुटता येतो. विशेष म्हणजे तु्म्ही सात तास ही पार्टी एन्जॉय करू शकता. पण, ही ट्रेन नेमकी कुठे आहे असा तु्म्हाला प्रश्न पडला असेल ना? चला तर मग जाणून घेऊ…

सध्या एका ट्रेनचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यात ट्रेनने प्रवास करताना प्रवाशांना नाईट क्लबची मजा घेता येत आहे. तुम्हीदेखील ट्रेनचा हा मनोरंजक व्हिडीओ पाहायला हवा, ज्यामध्ये तुम्हाला एक वेगळे दृश्य दिसत आहे. एकीकडे भारतासह काही देशांमधील ट्रेनमध्ये प्रवाशांना बसायला तर सोडा, उभं राहायला जागा मिळत नाही; ज्यामुळे रोज भांडण, हाणामारीच्या घटना घडताना दिसततात. पण, या ट्रेनमधील चित्र काही वेगळंच आहे. येथे प्रवासी चक्क पार्टी करण्यासाठी म्हणून ट्रेनमध्ये चढतात. ही ट्रेन तुम्ही आतून पाहिली तर क्लबपेक्षाही कमी वाटणार नाही.

A young man fell down while getting off the running train viral video of train accident
“मरता मरता वाचला भाऊ”, चालत्या ट्रेनमधून उलट्या दिशेने उतरला अन्…, VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Girl beautiful dance on Bahrla Madhumas Nava
‘डान्स करताना वय नाही पाहायचं…’, ‘बहरला मधुमास नवा’ गाण्यावर चिमुकलीचा हटके डान्स अन् जबरदस्त एक्स्प्रेशन्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
uncle dancing Mumbai local video | mumbai train irctc video
“काटा लगा…” मुंबई लोकलमध्ये काकांचा भन्नाट डान्स; Video पाहून युजर्स म्हणाले, “वाह क्या बात है”
vidhan sabha expenditure limit
मर्यादा चाळीस लाखांची… झाकली मूठ कैक कोटींची !
woman dies after falling from local train Incident between ambernath badlapur station
लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू ; अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यानची घटना
Audience sings for DU student during dance performance
VIRAL VIDEO : आतापर्यंतचा सर्वात भारी व्हिडीओ! डान्स करताना स्पीकर बंद पडला अन्… असा पूर्ण झाला तिचा पर्फोमन्स
Construction of roof on platform five of Dombivli railway station has started
डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट पाचवर छताच्या उभारणीस प्रारंभ; प्रवाशांचा उन, पावसात उभे राहण्याचा त्रास संपणार

मनालीमधील वाहतूक कोंडीला कंटाळून पर्यटकाने गाडी घातली थेट नदीत अन्… पाहा VIDEO

ट्रेनचा प्रवास की नाईट क्लब?

ही ट्रेन जर्मनीतील न्यूरेमबर्ग येथून धावते. टेक्नो ट्रेन ही न्यूरेमबर्गमधून विशेषतः संध्याकाळी सात तास नॉन-स्टॉप धावते. हे ठिकाण केवळ तिथल्या संस्कृतीमुळे प्रसिद्ध आहे.सु ही ट्रेन म्युनिकमध्ये सकाळी जाऊन थांबते. या प्रवासादरम्यान प्रवाशांना जर्मनीच्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील सुंदर दृश्ये पाहायला मिळतात. प्रवासी संध्याकाळी तिकीट घेऊन या ट्रेनमध्ये प्रवेश करतात आणि सात तास नाईट क्लबचा पुरेपूर आनंद घेतात. मोठ्या आवाजात म्युझिक आणि लाइटिंगचा झगमगाट असलेल्या या ट्रेनमध्ये चढणे हा एक अनोखा अनुभव आहे.

अनोख्या नाईट क्लब ट्रेनचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, इन्स्टाग्रामवर_likealeaf नावाच्या अकाउंटवरून अनोख्या ट्रेनचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना लोकांनी याला एक अनोखी आणि मजेदार गोष्ट म्हटले आहे. अनेकांनी एकदा तरी या ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद घ्यायची इच्छा व्यक्त केली आहे.