सोशल मीडियावर एकामागून एक असे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत, जे थक्क करणारे आहेत. आता दोन मुलांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, जे रस्त्यावर पडून आंदोलन करत रस्ता अडवतात. दोन्ही मुलांमुळे लोक खूप नाराज होतात. तेवढ्यात स्कूटी चालवणारा एक माणूस तिथे येतो आणि रस्त्यावर आडव्या पडलेल्या मुलाच्या अंगावरून स्कूटी काढून निघून जातो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर येताच तो व्हायरल झाला. या व्हिडीओवर अनेक यूजर्सच्या प्रतिक्रियाही येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रस्त्यावर आडव्या पडलेल्या मुलाच्या अंगावरून स्कुटी नेली
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दोन मुले कशी कपडे काढून उघड्यावर रस्त्यावर पडले आहेत हे दिसत आहे. तेवढ्यात दोन मुलं स्कूटी चालवत तिथं येतात आणि रस्ता थांबवून खाली पडलेल्या पोरांच्या शेजारी उभी राहतात. पुढच्याच एका स्कूटी चालकाने रस्त्यावर पडलेल्या मुलाच्या अंगावरून स्कूटी नेली आणि तिथून निघून गेला. हे बघून तो मुलगा एकदम चकित होतो आणि लगेच आहे त्या जागी उभा राहतो.

आणखी वाचा : याला म्हणतात स्मार्ट वर्क! स्कुटर सुरू करताच रेतीने भरलेली पोती इमारतीच्या उंच मजल्यावर पोहोचली! पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : बंदुकीचा धाक दाखवून बाईक चोरी करू लागले, पण काही मिनिटांतच चित्र उलटलं, पाहा VIRAL VIDEO

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सुपरऑटोविप नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्सच्या कमेंट्स येत आहेत. एका व्यक्तीने लिहिले, “मला अंदाज आहे की त्याला तिथे चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ नसेल.” दुसर्‍या एका व्यक्तीने लिहिले, ‘त्याने बरोबर केले.’ आणखी एका यूजरने लिहिले, ‘रस्ता झोपण्यासाठी बनलेला नाही.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of two boys lying down to stop the road see what happened next omg went viral prp