Viral Video of two kids dancing: आजकालची लहान मुलं अगदीच हुशार आणि चपळ आहेत असं म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियाच्या या जगात लहान मुलांना आपले कला-गुण दाखवायला एक प्लॅटफॉर्मच जणू मिळाला आहे. अभिनय, कॉमेडी, डान्स, गाणी अशा विविध कला लहान मुलं सोशल मीडियावर सादर करताना दिसतात. अनेकदा त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि त्यांना लहानपणीच सुपरस्टार होण्याची संधी मिळते.

सध्या अशाच दोन चिमुकल्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत दोघंही ३७ वर्षे जुन्या मराठी गाण्यावर थिरकताना दिसतायत. त्यांच्या व्हिडीओला तब्बल ५ मिलियन व्ह्यूज आले आहेत. या व्हिडीओत नेमकं आहे तरी काय, जाणून घेऊया.

हेही वाचा… पहिला गिळला चाकू नंतर चाव्यांचा जुडगा; शस्त्रक्रियेदरम्यान पोटात सापडल्या बऱ्याच वस्तू अन्…, डॉक्टरांनी सांगितली डोके चक्रावून टाकणारी घटना

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. या व्हिडीओत एका लहान मुलीने साडी नेसलीय, तर लहान मुलाने पोलिसांचा गणवेश परिधान केला आहे. १९८७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दे दणादण’ या चित्रपटातील गाण्यावर हे दोघेही थिरकताना दिसतायत. “पोलिसवाल्या सायकलवाल्या बिरेक लावून थांब” या गाण्यावर दोघांनी जबरदस्त डान्स केलाय. दोघांच्या या डान्सचं कौतुक सध्या इंटरनेटवर होतंय.

‘vedanti_the_dramebaaz’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “जाऊया डबल शीट र लांब लांब लांब..” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं गेलं आहे. या व्हिडीओला अगदी काहीच वेळात तब्बल ५ मिलियन व्ह्यूज आले आहेत. तर ९३ हजारांपेक्षा जास्त लाईक्सही या व्हिडीओने मिळवले आहेत.

हेही वाचा… हेच ते आप्पा! ‘आप्पाचा विषय लई हार्ड ए’ गाण्यातील आप्पा अखेर सापडलेच, आजोंबाचा स्वॅग पाहून तुम्हालाही बसेल धक्का

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून युजर्सनी व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तुमच्यामुळे आम्हाला लहानपण आठवलं.” दुसऱ्याने “लय भारी” अशी कमेंट केली. तर अनेकांनी इमोजी शेअर करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा… डान्स करता करता मुलानं झटकला मुलीचा हात; ‘त्या’ समारंभात नेमकं घडलं तरी काय? VIRAL VIDEO एकदा पाहाच

दरम्यान, यातील चिमुकलीचं नाव वेदांती आणि चिमुकल्याचं नाव ह्रदान असून दोघांनी झी मराठी वाहिनीवरील ‘ड्रामा ज्यूनिअर्स’मध्ये सहभाग घेतला आहे.