Mumbai Local Viral Video: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. दररोज सकाळी कामावर जाणाऱ्यांची लगबग आणि धक्काबुक्की करत ‘अंदर बहुत जगा है’ असं म्हणत मुंबई लोकलमध्ये दर दिवशी असंख्य माणसांची गर्दी पाहायला मिळते.

यात उशीर झाला म्हणून चालती ट्रेन पकडणारे प्रवासी अनेक असतात. अशात ज्यांना चालती ट्रेन कशी पकडायची हेच माहीत नसतं आणि दुसऱ्यांना बघून स्वत:पण असलं काहीतरी करायला जातात आणि स्वत:वर संकट ओढावून घेतात, अशी माणसंही अनेक आहेत. सध्या अशाच माणसाचं उत्तम उदाहरण देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक काका चालती ट्रेन पकडतायत. पण, या नादात ते चालत्या ट्रेनमध्ये दरवाजातच लटकून राहतात.

हेही वाचा… “फक्त मुंबईतील लोक…”, मेट्रोत तरुणाबरोबर घडलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक तरुण चालत्या ट्रेनमधून उतरताना दिसतोय. ट्रेनमधून उतरल्यानंतर त्या तरुणाला असं दृश्य दिसतं, जे पाहून तो कपाळावरच हात मारतो. त्याच ट्रेनमध्ये लोकलच्या मागच्या डब्यात एक माणूस लटकताना दिसतो आहे. धावती ट्रेन पकडण्याच्या नादात उलट्या बाजूने तो माणूस चढतो आणि तसाच लटकून राहतो. फलाटाला पाय टेकत टेकत स्वत:चा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असताना फलाटावर जमलेली मंडळी त्याची मदत करतात. त्याला पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. अपघात होऊ नये म्हणून लगेच आजूबाजूला असणाऱ्या प्रवाशांनी त्याला मदत केली आणि ट्रेनमध्ये ढकललं. हा भयंकर प्रकार पाहून त्या तरुणाने चक्क कपाळावरच हात मारला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

हा व्हिडीओ @aaplashivpatil या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तब्बल १.६ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… शेवटी आई ती आईच! मुलाला वाचवण्यासाठी आईने सर्वस्व पणाला लावलं, पाहा VIDEOमध्ये नेमकं काय घडलं?

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “काकांनी चालती ट्रेनच काय, पण चालती बसही कधी पकडलेली दिसत नाहीय.” तर दुसऱ्याने “काका ट्रेनला धक्का देतायत” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “काका ट्रेन चालवत आहेत.”

दरम्यान, सोशल मीडियावर मुंबई लोकलचे असंख्य व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. त्यात हा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.