आपल्यातील प्रत्येकाला गाडी, दुचाकी चालवण्याची इच्छा असते. यासाठी अनेक जण ड्रायव्हिंग क्लासेस, तर काही जण कुटुंबातील सदस्यांकडून गाडी कशी चालवायची हे शिकून घेतात. तर आज सोशल मीडियावर असंच काहीस पाहायला मिळालं आहे. पण, आज तरुण मंडळी नाही तर नातवंडाच्या मदतीने ९५ वर्षीय आजी पहिल्यांदाच गाडी चालवताना दिसते आहे व सोशल मीडियावर आजीचे जोरदार कौतुक होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, आजीचा नातू तिला गाडी चालवायला शिकवतो आहे. सुरवातीला तो आजीला थंब्स अप करायला सांगतो तसेच आजीला गाडी चालवता चालवता थंब्स अप करते. त्यानंतर नातू पहिल्यांदा गाडी चालवताना कसं वाटत आहे असे विचारतो. त्यावर आजी एकदम हळू आवाजात भीती वाटते आहे असे उत्तर देते. पाहा आजी आणि नातवाचा हा संवाद.

हेही वाचा…तरुणाने Zomato वरून मागवला केक! नाव लिहिताना केली ‘ही’ चूक आणि मग… पाहा मजेशीर पोस्ट

व्हिडीओ नक्की बघा :

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, आजी साडी नेसून, स्वेटर घालून स्टेअरिंग पकडून गाडी चालवण्याचा सराव करते आहे. यादरम्यान आजीचा नातू तिला गाडी चालवताना मजा येते आहे का असे विचारून, गावी जाऊन तू गाडी चालवली आहेस हे सुद्धा आवर्जून सांग असे सांगताना दिसतो आहे. तर शेवटी आजी नातवंडाला ओरडते आणि गाडी चालवू देत मला असे तिच्या भाषेत सांगताना दिसते.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @the_phoenix_soul या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या व्हिडीओला ‘माझी ९५ वर्षांची आजी पहिल्यांदाच गाडी चालवत आहेत’ ; असे कौतुकाने कॅप्शन लिहिण्यात आले आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून आजीची विविध शब्दात प्रशंसा करताना दिसत आहे. एकूणच या व्हिडीओने सोशल मीडियावर अनेकांच लक्ष वेधून घेतलं आहे.