आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. लग्नात तर मित्र अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात. अनेकदा य मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात, असाच एक लग्नातील कारनामा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मित्र हे नेहमीच एकमेकांची मस्करी करत मजा घेत असतात, मग त्याला वेळ काळ, ठिकाण असं काही लागत नाही. मग ते मित्राचं लग्न का असेना. अशाच मित्रांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत, यावेळी मंगलाष्टका सुरु आहे.लग्नात मंगलाष्टका सुरु असतात. नवरा- नवरी एकमेकांना हार घालतच असतात. तेच एका बाजूने नवऱ्याचे मित्र मोठ्याने मोये मोये ओरडतात. त्यावेळी नवरा हळूच गालात हसतो. तर नंतर मस्करी केल्याने नवरी एकदम रागात लूक देते. याचाच व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Vinod Kambli Message to Sachin Tendulkar
Vinod Kambli : विनोद कांबळीचं वक्तव्य, “मी मरणार नाही, सचिनला निरोप द्या, मी लवकरच…”
Atal Bihari Vajpayee Sand Sculptures, Bhatye Beach,
रत्नागिरी : भाट्ये समुद्रकिनारी अटलबिहारी वाजपेयींचे वाळूशिल्प
Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Santosh Deshmukh Wife Crying
Santosh Deshmukh : संतोष देशमुख यांच्या पत्नीची साश्रू नयनांनी मागणी, “मुख्यमंत्र्यांनी..”

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला खूप खास दिवस असतो. त्यादिवशी सगळं व्यवस्थित पार पडावं कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी सर्व गोष्टींची व्यवस्थित तयारी केली जाते. त्या आनंदाच्या दिवशी आपल्या नातेवाईक, मित्रमंडळी सर्वांनी या शुभप्रसंगी हजेरी लावावी अशी वधु वरांची इच्छा असते. 

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पेट्रोल भरताना दुचाकीला अचानक आग, कर्मचाऱ्यांनी बाईक फेकली रस्त्यावर; कानपूरमधला VIDEO व्हायरल

हा व्हिडीओ @khandakezzzzz या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर कमेंट करून लोक नवरदेवाची मस्करी करत आहेत.दुसऱ्या एका यूजरने लिहिलं, नवरदेवानेही याच्या लग्नात अशीच मस्करी केली असेल म्हणूनच मित्र बदला घेत आहे. आणखी एकाने लिहिलं, अशा मित्रांना लग्नातच बोलवायचं नाही. यासोबत इतरही अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

Story img Loader