Viral video: सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही फनी असतात, जे बघितल्या बघितल्या लोटपोट होऊन हसायला येतं. तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्यही वाटतं. असे व्हिडीओ यूजर्सना आवडतातही आणि ते शेअर करून त्यावर कमेंट्सही करतात. लग्न समारंभीत नेहमीच गमती-जमती चालत राहतात. अनेक नवरी-नवरदेव गंमत करतात. तर काही पाहुणेही त्यांची मजा घेतात. खास करुन नवरदेवाच्या किंवा नवरीच्या कलवऱ्यांची तर लग्नात हमखास चर्चा असते. दरम्यान भर लग्नात नवरीने असं काही केलं की व्हिडिओ पाहून काही लोक भडकले आहेत . त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आपली नाराजी व्यक्त केली आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लग्नाच्या मंडपात विधी सुरू असल्याचे दिसत आहे. वधू-वरांचे कुटुंबीय आणि नातेवाईक मंडपात बसलेले दिसतात. नवरदेव आपल्या वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालत असतो. अशात नवरी असे काही करते ज्यामुळे नवरदेव लाजू लागतो. नवरा नवरी मंगळसूत्र घालताना तिच्याकडे सरकतो, त्यावेळी नवरी नवरदेवाच्या गालावर चुंबन घेते. हे पाहून मंडपातील सर्व कुटुंबातील लोकांना हसू येतं. परंतु नवरदेव शरमने मान खाली करत खाली पाहतो.
या व्हिडिओला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय, मोठ्या संख्येनं लोकांनी व्हिडिओवर मजेदार कमेंट्स देखील केल्या आहेत, ज्या वाचून तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> बापरे! स्कूटरवर बसून तरुण आकाशात उडाला; VIDEO पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही या व्हिडीओवर गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.