दिवाळी जवळ आली की साफसफाई करण्यासाठी प्रत्येकाच्या घरी लगबग सुरू असते. एखादा सुट्टीचा दिवस मिळाला की घरातले प्रत्येक जण साफसफाई करण्याची जणू मोहीमच हातात घेतात. पण, यात स्त्रियांचा हात धरणं जरा अवघडच आहे.

आपल्या घराचा कोपरा न कोपरा साफ असावा हे घरातल्या करत्या स्त्रीला नेहमी वाटत असतं आणि खास करून दिवाळीला घर टाप-टीपच असावं असा तिचा हट्ट असतो. पण, कधीकधी अशी साफसफाई जीवघेणीदेखील ठरू शकते. सध्या अशाच एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात ही महिला इमारतीच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर खिडकी साफ करताना दिसतेय. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला कोणत्याही संरक्षणाशिवाय इमारतीच्या खिडकीबाहेर उभी राहून साफसफाई करतेय.

siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
ranveer allahbadia dating actress nikki sharma
प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादियाने शेअर केला गर्लफ्रेंडचा फोटो? ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? चाहत्यांनीच केला खुलासा
deepika padukone visited diljit dosanjh concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दीपिका पादुकोणने घेतली एन्ट्री; व्हायरल व्हिडीओमध्ये गाण्यांवर थिरकताना दिसली अभिनेत्री
Priyadarshini Indalkar
“त्या स्कीटनंतर इतकं हसं झालं”, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील किस्सा; म्हणाली…
Lakshmi Niwas Fame Meenakshi Rathod Daughter Yara sing Majha Bhimraya song
Video: ‘लक्ष्मी निवास’ नव्या मालिकेत झळकणाऱ्या अभिनेत्रीच्या चिमुकल्या लेकीनं गायलं ‘माझा भिमराया’ गाणं, व्हिडीओ पाहून कराल कौतुक
Shocking video woman booked for assaulting father in law with walking stick shocking video goes viral
“कर्म फिरुन येणार” सुनेनं गाठला क्रूरतेचा कळस; सासऱ्यासोबत केलं असं काही की…VIDEO पाहून बसेल धक्का

हेही वाचा… VIDEO: “अरे तिच्या बापाला काय वाटलं असेल”, रत्नागिरीत कंडक्टरने विद्यार्थीनीची काढली छेड; मुलींनी दाखवला दुर्गावतार

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओत एक महिला अतिशय धोकादायक पद्धतीने खिडक्या साफ करतेय. खिडकीवर अगदी बिनधास्त उभी राहून ती साफसफाई करताना दिसतेय. अगदी आपल्या जीवाचीही पर्वा न करता आणि कोणत्याही सुरक्षिततेची खबरदारी न घेता ती खिडकीच्या काठावर उभी असल्याचे व्हिडीओमध्ये दिसतेय.

हा व्हिडीओ @peopleofculture या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. जर दिवाळीला यांच्या घरी लक्ष्मी नाही आली तर कोणाच्याच घरी येणार नाही, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. ही घटना नेमकी कुठे घडली आहे हे अद्याप समजलेलं नाही.

हेही वाचा…  “अरे काहीतरी लाज बाळग”, भररस्त्यात तरुणीचा अश्लील डान्स; VIDEO पाहून नेटकरी संतप्त

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या व्हिडीओने सोशल मीडिया युजर्सचं लक्ष वेधून घेतलं आहे. अनेकांनी या साफसफाईच्या जीवघेण्या कृतीवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “लक्ष्मीजी माहीत नाही, पण जर ती महिला पडली तर यमराज नक्कीच येतील. “खतरो कें खिलाडी” अशी कमेंट दुसऱ्याने केली. तर एक जण म्हणाला, “अशी जीवघेणी सफाई कृपया करू नका.” तर “सफाई त्या करतायत भीती मला वाटतेय”, “हीच तर लक्ष्मी आहे”, “भारतीय आयांसाठी हे नॉर्मल आहे”, अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.

दरम्यान, याआधीही अशी साफसफाई करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, जी तब्बल १६ व्या मजल्याच्या खिडकीबाहेर उभी राहून साफसफाई करत होती. त्यानंतर आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Story img Loader