Uyi amma dance viral video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. त्यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंतची मंडळी सोशल मीडियावर थिरकताना दिसतात. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, तर कधी रस्त्यांवर; काही जण फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी अशा विविध प्रकारच्या डान्सचा आधार घेत असतात; तर काही जण फक्त स्वत:च्या मजा, आनंदासाठी तो क्षण एन्जॉय करत असतात.
काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘गुलाबी साडी’, ‘तौबा तौबा’, ‘पीलिंग्स’, ‘तांबडी चांबडी’, ‘आज की रात मजा हुस्न का…’ ही गाणी खूप चर्चेत आली आहेत. तसंच अभिनेत्री रविना टंडनची मुलगी राशा थडानीचा चित्रपट ‘आझाद’ गेल्याच महिन्यात प्रदर्शित झाला. पण, या चित्रपटाचं गाणं ‘उई अम्मा’ हे चांगलंच गाजलं. या गाण्यावर अनेक कलाकारांनी, सोशल मीडिया स्टार्स आणि अनेकांनी रील्स करत, डान्स करत व्हिडीओज अपलोड केले, जे व्हायरल झाले. सध्या या गाण्यावर एका महिलेचा परफॉरमन्स चर्चेत आला आहे.
महिलेचा डान्स व्हायरल
उई अम्मा या गाण्यावर एका लहान मुलीसोबत साडी नेसलेल्या एका महिलेच्या डान्सचा व्हिडीओ इंटरनेटवर खूप गाजला आहे. तिची ऊर्जा, उत्साह आणि स्टेप्स इतक्या अचूक होत्या की कोरिओग्राफर रेमो डिसूझानेदेखील या व्हिडीओवर कमेंट केली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एका कार्यक्रमात एक महिला बॉलीवूड गाण्यावर थिरकताना दिसली. तिची साथ देण्यासाठी एक लहान मुलगीही तिच्याबरोबर थिरकत होती. पण, या महिलेच्या डान्सनेच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अभिनेत्रीसारख्या हुबेहूब डान्स स्टेप्स करत या महिलेने सगळ्यांचं मन जिंकून घेतलंय.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @didsupermoms_riddhitiwari_ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल तीन मिलियन व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “काकींनी तर त्या लहान मुलीलाही फेल केलं”, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “आईने काय सुंदर डान्स केला आहे”, तर तिसऱ्याने “तुम्ही डान्स शोमध्ये भाग घेतला पाहिजे” अशी कमेंट केली. तसंच प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांनीदेखील या व्हिडीओवर हार्टचे इमोजी वापरत कमेंट केली.