Viral Video of woman dancing in the rain: मागील काही दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. पर्यटक या वर्षा ऋतूचा आनंद घेण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जात आहेत. परंतु, शहरी भागात राहणारी माणसं पावसाळ्यात पावसाच्या साचलेल्या पाण्यामध्येच धबधब्याचा आनंद घेतात असं म्हणायला काही हरकत नाही.

पावसाळा सुरू झाला की जागोजागी पाणी साचलेलं दिसतं, म्हणून नागरिकांनी गरजेनुसारच घराबाहेर पडा, वाहने सावकाश चालवा, असे आदेश नेहमीच ऐकायला मिळतात; तरीही या आदेशाचं पालन अनेकदा न होतानाच आपल्याला दिसतं.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Trending Video girls group dance on marathi song hriday vasant phultana video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “हृदयी वसंत फुलताना..” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींच्या डान्सने सर्वांनाच लावलं वेड
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच
Funny video Drunk man doing dance at a haladi ceremony funny video viral social media
देशी दारु अशी चढली की…हळदीला भर मांडवात काकांनी काय केलं पाहा; कोकणतल्या हळदीचा Video पाहून पोट धरुन हसाल
filght Footage
विमानात नको त्या अवस्थेत सापडले जोडपे! Video झाला व्हायरल, क्रू सदस्यांची चौकशी सुरू, नेटकऱ्यांचा संताप

हेही वाचा… मूर्ती लहान, पण कीर्ती महान! ३ वर्षाच्या चिमुकल्याने वाचवला आजीचा जीव; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

तसेच सोशल मीडियाच्या युगात इन्फ्लुएन्सर पावसाळ्यातदेखील सार्वजनिक ठिकाणी डान्सचे व्हिडीओ शूट करून काही नियमांचं उल्लंघन करतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, जिथे एक तरुणी रस्त्यावर पावसाचा आनंद घेत असताना अचानक मागून एक दुचाकीस्वार येतो आणि तिला भिजवून जातो. आता यात चूक नक्की कोणाची ते तुम्हीच सांगा.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक महिला रस्त्यावर पावसाच्या साचलेल्या पाण्यात डान्स करत असते आणि व्हिडीओ शूट करत असते. तितक्यात मागून अगदी जोरदार स्पीडने एक बाईक येते आणि तरुणीला भिजवून जाते. बाईक चालवणारी व्यक्ती त्या तरुणीला साचलेल्या पावसाच्या पाण्याने संपूर्णपणे भिजवून टाकते.

युजर्सच्या प्रतिक्रिया (Users Comments)

marathi_epic_jokes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल होताच या व्हिडीओवर युजर्सने मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “भाऊ बहुतेक सरळ जाणार होता, पण त्या मुलीला पाहून त्याने रस्ता बदलला”; तर एक जण म्हणाला, “त्या मुलाला पाणी उडवा, मुलीला भिजवा पुरस्कार मिळाला पाहिजे”, अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा… चालत्या ट्रकमध्ये मारली उडी अन्…, अपघात टाळण्यासाठी महिलेने केलं ‘असं’ काही की…, VIDEO पाहून अंगावर येईल काटा

मात्र, काहींना त्या बाईक चालवणाऱ्या व्यक्तीचं वागणं पटलं नाही आणि अशा वागण्याला नेटकऱ्यांनी तीव्र विरोध केला.

एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “यात कूल बनण्यासारखं काही नाही आहे, ती फक्त तिचा डान्स करत होती.” तर दुसऱ्याने लिहिलं, काही लोकांना दुसऱ्यांचा आनंद बघवत नाही आणि नंतर ती लोक मुलींनाच नावं ठेवतात.” तर एका नेटकऱ्याने लिहिलं, “त्याने मुद्दाम तरुणीला भिजवलं.”

Story img Loader