Viral Video of Woman falling from hill: आजच्या काळात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंचं प्रमाण वाढत चाललंय. अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेक जण सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. सोशल मीडियावर आपली कला सिद्ध करून अनेक इन्फ्लूएंसर यशाच्या थिखरावर पोहोचले आहेत. परंतु, काही जण याचा वापर अगदी थिल्लरपणा करण्यासाठी करतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेकदा सोशल मीडियावर डान्स व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर, तर कधी उंच डोंगरावर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी स्वत:च्याच जीवाशी खेळून अशा ठिकाणी लोकं व्हिडीओ करत असतात. अशा व्हिडीओंमुळे अनेकांच्या जीवावर बेतलेलं आपण ऐकलंच आहे. आता असाच जीवघेणा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक महिला एका उंच ठिकाणी डान्स करायला गेली आणि घसरून पडली.

हेही वाचा… आता हेच बाकी होतं! दिल्ली मेट्रोत तरुणीने केली प्रग्नेन्सी टेस्ट, अश्लील Video Viral होताच नेटकरी संतापले; म्हणाले, “लाज…”

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक महिला टेकडीसारख्या उंच ठिकाणी डान्स करताना दिसते आहे. साडी नेसून ही महिला टेकडीच्या अगदी टोकावर जोरजोरात डान्स स्टेप्स करते आहे. डान्स करताना अचानक टेकडीवरचा एक भाग कोसळतो आणि ती घरंगळत खाली पडते.

खाली पडल्यानंतर या महिलेच्या संपूर्ण अंगाला माती लागते. पण, पडल्यावर रडायचं सोडून ही महिला चक्क हसायलाच लागते. यावरून कळतंय की तिला जास्त लागलं नसावं. जास्त ठिकाणी खडकाळ भाग नसून मातीचा भाग असल्याने महिला जीवघेण्या प्रसंगातून वाचली. ‘sk.video_creator_9k’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा… Fire at petrol pump Viral Video: महिलेच्या धाडसाला सलाम! पेट्रोल पंपावर बाईक पेटली अन्…, अवघ्या १२ सेकंदात घडलं ‘असं’ काही

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहिलं, “हड्डी टूटे तो टूटे पर डांस ना छुटे”, तर दुसऱ्याने “खाली पडली तरी हसतेय”

“एक नारी सब पे भारी”, “यापुढे कधी रील्स नाही बनवणार”, “पहाडतोड डान्स केला आहे”, अशा प्रकारच्या अनेक कमेंट्स या व्हिडीओवर केल्या आहेत.

दरम्यान, अशाप्रकारे रील्स करताना अनेक जण आपल्या जीवाला मुकले आहेत. रील्सच्या नादात असे प्रसंग घडलेल्या बातम्या दररोज येत असूनही आजही लोकं स्टंट करत आपल्या जीवाशी खेळतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video of woman falling from hill after making dance reel on social media dvr