सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो. काही विनोदी व्हिडीओ असतात जे काही मिनिटांतच व्हायरल होतात. असाच एक विनोदी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक महिला तिच्या पतीविषयी वाईट बोलते.
खरतरं, ट्विटरवर एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीयोत ही महिला पॅराग्लायडिंग करत असल्याचे दिसते. पॅराग्लायडिंग करण्याची तिची कोणतीही इच्छा नसल्याचे दिसते. पण फक्त पतीने सांगितल्यामुळे ती करत असल्याचे दिसते. या महिलेल्या पॅराग्लायडिंग आणि उंचावर जाण्याची भीती वाटते. या व्हिडीओत दिसते की ती महिला पॅराग्लायडिंगसाठी गाइड करणाऱ्या व्यक्तीसोबत डोंगरावरून पॅराग्लायडिंग करण्यासाठी उडी मारते. त्यानंतर ती सतत बोलते, “मला पॅराग्लायडिंग करायचं नाहीये… मला डोळे उघडायचे नाहीत. मला खाली आण दादा आणि तोंडावर असलेला हाथ काढते आणि खाली बघते तर तिला आणखी भीती वाटते. पण घाबरलेली ती महिला रागात बोलते, माझा पती खूप वाईट आहे…ब्रिजेश मी तुझा जीव घेईन…देवा तू माझं लग्न याच्याशी का केलं.”
आणखी वाचा : जावयासाठी ३६५ प्रकारच्या पदार्थांची मेजवानी! अनोख्या आदरातिथ्याचे फोटो Viral
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल अशाच एका व्हिडीओची आठवण करून देतो, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ २०१९ मध्ये व्हायरल झाला होता. यावेळी तो व्हिडीओ लॅन्ड करा दे या नावाने व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ देखील पॅराग्लायडिंगचा होता.