Viral Video of woman jumps onto moving truck for saving accident: सोशल मीडियावर असंख्य व्हिडीओ दर-दिवशी व्हायरल होत असतात. यात काही मजेशीर व्हिडीओ, तर काही गंभीर व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. आता तर अपघातांच्या व्हिडीओंचं प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जगभरात ठिकठिकाणी होणारे अपघात आपण सोशल मीडियावर पाहत असतो. काही अपघात थोडक्यात झालेले असतात, तर काही मोठे अपघात मनाला अगदी वेदना पोहोचवून जातात. पण, जर अपघात वाचवणं आपल्या हातात असेल आणि चातुर्याने जर तो अपघात होण्यापासून आपण वाचवू शकलो तर त्याचं समाधान काही जीवनदानापेक्षा जास्त नाही. असाच काहीसा प्रकार एका ठिकाणी घडला आहे. एका महिलेच्या चतुराईमुळे ट्रकचा अपघात होता होता वाचला आहे. पण नेमक घडलं तरी काय, जाणून घेऊया.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओत महिलेच्या एका धाडसी निर्णयामुळे एक अपघात होण्यापासून वाचला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत आपण पाहू शकता की, एका ट्रकचा ताबा सुटतो आणि आपोआप तो पुढे जाऊ लागतो. ट्रकचा अपघात होणार तितक्यात एक महिला चालत्या ट्रकमध्ये चढते आणि हॅण्डब्रेकचा वापर करून ट्रक थांबवते.
तसंच ट्रकवरचा ताबा सुटलेला असताना तो अपघात होण्यापासून वाचवण्यासाठी दोन माणसं त्याला मागून खेचण्याचा प्रयत्न करत असतात, पण मागून ते शक्य होत नसल्याने, महिला प्रसंगावधान दाखवून त्यांच्या मदतीला धावून येते; यामुळे ट्रकचं मोठं नुकसान होता होता वाचलं.
हा व्हायरल व्हिडीओ ‘adultsociety’ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. “हँडब्रेक ओढण्यासाठी धाडसी महिलेने चालत्या ट्रकमध्ये उडी मारली” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
महिलेच्या धाडसाचं कौतुक (Users Comments)
व्हिडीओ व्हायरल होताच युजर्सने भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं, “अभिमानास्पद, ती महिला किती सक्रिय आणि धाडसी आहे.” तर एक जण म्हणाला, “महिलांच्या शक्तीला कधीही कमी लेखण्याचा प्रयत्न करू नका”, तर अनेकांनी मागून ट्रक खेचणाऱ्या त्या दोन पुरुषांची खिल्ली उडवली.