सोशल मीडियावर आजकाल आपण कधीही न पाहिलेले, भयंकर आणि धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. धक्कादायक वाटणाऱ्या व्हिडीओंमध्ये जंगली प्राण्यांच्या मोठ्या प्रमाणात समावेश असतो. कधी भलामोठा अजगर एखाद्या माणसाला आपल्या विळख्यात घेतानाचा अंगावर शहारा आणणारा, तर कधी महिलेच्या तोंडात साप शिरल्याचा धक्कादायक व्हिडीओ तुम्ही याआधी पाहिले असतील.

मात्र, सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो तुम्ही याआधी पाहिलेल्या व्हिडीओंपेक्षाही भयानक आहे. त्या व्हिडीओमध्ये एक महिला चक्क डरकाळी फोडणाऱ्या सिंहिणीला आपल्या कडेवर उचलून घेऊन जाताना दिसतं आहे. ते दृश्य पाहून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

Anand Hendre created a world cup scene for Ganeshotsav
असा देखावा पाहिलाच नसेल! १५ फूट ऊंच बॅट, वर्ल्ड कपची ट्रॉफी आणि भल्या मोठ्या चेंडूत गणपती बाप्पा
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
gauraksha worker beaten up kalyan marathi news
कल्याणमध्ये अ. भा. गौ रक्षा महासंघाच्या कार्यकर्त्याचे अपहरण करून तबेल्यात बेदम मारहाण, जिवंत गाडून टाकण्याची आरोपींची धमकी
Shakuntala Bhagat, First woman civil engineer,
शकुंतला भगत… भारतात ६९ पूल बांधणाऱ्या पहिल्या महिला सिव्हिल इंजिनिअर
ngo umed education charitable trust
सर्वकार्येषु सर्वदा : वेशीबाहेरील मुलांची शाळा
Hanumankind music video woman maut ka kuan
Big Dawgs: ‘मौत का कुआं’मध्ये स्टंट करणारी कल्याणची कांचन आणि पती सुलतान शेखची प्रेम कहाणी, रॅपर साँगच्या माध्यमातून ठरली जगभरात चर्चेचा विषय
Bhandup, security guard, Security Guard Brutally Beaten to Death, murder, gym trainer, entry dispute, Dream Society, Mumbai, arrest, police
इमारतीमध्ये जाण्यास रोखल्याने सुरक्षा रक्षकाची हत्या
Biker performs dangerous stunt
‘यालाच खरं प्रेम म्हणतात का?’ स्टंटच्या नादात प्रेयसीचा जीव घातला धोक्यात; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

आणखी पाहा- Video: देवाची करणी अन.. ; ४ भल्या मोठ्या बैलांनी एकट्या माणसाला घेरलं, हल्ला करणार इतक्यात समोरून..

सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात, शिकार करण्यात तरबेज असणारे देखील मोठमोठे शिकारी देखील सिंहासमोर उभे राहण्याचं धाडस करत नाहीत. शिवाय सिंहा इतकीच सिंहीण देखील एकाच हल्ल्यात कोणत्याही प्राण्याला गारद करु शकते. त्यामुळे सिंहाची शिकार करायला किती धाडस असावं लागेल, याचा अंदाज तुम्ही लावू शकता. पण अशा ताकदवर सिंहिणीला एखादी महिला आपल्या कडेवर अलगद उचलून घेऊन जात आहे, असं तुम्हाला कोणी सांगितलं तर त्यावर विश्वास बसणार नाही.

पण ते खरं आहे, हे तुम्हाला व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर कळेल. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला चक्क सिंहिणीला उचलून घेऊन जाताना दिसतं आहे. त्यामुळे सिंहिणीला आव्हान देणारी ही ‘शेरणी’ असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. तर महिला ज्या सिंहिणीला घेऊन जाताना दिसतं आहे, ती सिंहिण पाळीव असल्याचं देखील काही नेटकरी म्हणत आहेत.

घरातून पळालेली सिंहिण ?

दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील सिंहिण तिच्या मालकीनीच्या घरातून पळून आली होती. सिंहिणीला रस्त्यावर बघून लोकांची एकच तारांबळ उडाली, या घटनेची माहिती मालकीनीला मिळताच ती रस्त्यावर असणाऱ्या सिंहिणीला घेऊन गेल्याचं सांगितलं जातं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्याला एक लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.