Video Viral of women abusing men: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यामध्ये बिहारमध्ये ट्रेनमध्ये बसण्यावरून झालेल्या वादानंतर एक महिला पुरुषाला शिवीगाळ करताना दिसत आहे. गर्दीच्या ट्रेनमध्ये महिलेने शिवीगाळ केल्याने त्या व्यक्तीने व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्या पुरुषाच्या पायाजवळ महिला प्रवासी बसलेली असून, ती त्याला सीटवरून पाय काढण्यास सांगत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

व्हायरल व्हिडीओ (VIRAL VIDEO)

ही घटना बिहारमध्ये घडली असून, नेमके ठिकाण समजू शकलेले नाही. मात्र बिहारमधील ट्रेनमध्ये ही घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, ट्रेन पाटणा येथे पोहोचताच ही महिला त्या पुरुषाला धमकावताना दिसत आहे. “तू समझता क्या है अपने आप को, तुम्हारे बाप का है क्या ट्रेन” (तुम्ही स्वतःला काय समजता, ट्रेन तुमच्या वडिलांची आहे का?) असे स्त्री या व्हिडीओमध्ये म्हणताना ऐकू येत आहे. तेव्हा तो माणूस उत्तर देतो, “नही तो क्या आपके बाप का है” (नाही तर काय तुमच्या वडिलांची आहे काय?)

Chinese tourist fell down from train
‘सेल्फी’साठी तरुणी ट्रेन बाहेर डोकावताच झाडाला आदळली अन्…; पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही, पाहा अपघाताचा थरारक VIDEO
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Female Chinese Tourist Miraculously Survives After Falling From Running Train In Colombo Chilling Videos
धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात उभी होती तरुणी, अचानक पाय सटकला अन्…. थरारक घटनेचा Video Viral
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Woman suffers heart attack in Amravati Parvatawa bus of State Transport Corporation
अमरावती : धावत्‍या बसमध्‍ये काळाने गाठले! तिकीट काढतानाच महिला…
confusion among passengers after badlapur local departing from thane replaced with csmt local train
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ; अचानक मुंबई दिशेकडे जाणारी लोकल लावल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
drunk driver injures woman police officer at checkpost
नाकाबंदीत मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले

त्यानंतर महिला चिडली आणि त्या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. त्यानंतर महिलेने पुरुषाला शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि मग त्या पुरुषानेही तिला शिवीगाळ केली. व्हिडीओमध्ये (VIRAL VIDEO) ट्रेनमधील गर्दी दिसत आहे. ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या लोकांचीही त्या दोघांना पर्वा नव्हती. पुरुषाने तिला तिकिटाबद्दल विचारले असता, त्या महिलेने विषय बदलला आणि त्याला म्हणाली, “तुम्ही टीसी आहात का; मी तुम्हाला तिकीट का दाखवू?”.

हेही वाचा… लिफ्टमध्ये अडकला माणूस पण मागे वळताच…; नेमकं घडलं तरी काय? VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

त्यानंतर ती महिला रागाने उभी राहिली आणि त्या पुरुषाला मोठ्या आवाजात शिवीगाळ करताना दिसली. वाद घालताना महिलेला आणखी राग आला आणि तिने व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्या प्रवाशावरही हल्ला केला. हल्ला करताच फोन जमिनीवर पडला. त्यामुळे व्हिडीओ संपल्याचं आपण पाहू शकतो.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Video Viral) शेअर करण्यात आला असून, ती सीट पुरुषाची होती आणि ती महिला त्याच्या सीटवर येऊन बसली असल्याचे बोलले जात आहे. जेव्हा त्या व्यक्तीने तिला झोपायचे आहे म्हणून तिला तिथून उठण्यास सांगितले तेव्हा ती महिला चिडली आणि तिने आरडाओरड करायला सुरुवात केली. हा व्हिडीओ ‘Deepika Narayan Bhardwaj’ या एक्स अकाउंटवरून व्हायरल झाला आहे. “तिकीट असलेला पुरुष त्याच्याच सीटवर पाय पसरून बसला होता. त्यावरून एका महिलेने शिवीगाळ करीत त्याला धमकीही दिली”, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलेली आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एकानं कमेंट करीत लिहिलं, “हे स्मार्टफोन्स पुरुषांचे प्राण वाचवत आहेत.” दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं, “लोक हे भांडण रोखण्यापेक्षा त्याचा आनंदच जास्त घेत आहेत.”

Story img Loader