आधी असा एक काळ होता जेव्हा कबड्डी हा खेळ लोकप्रिय असून सुद्धा गल्लीमध्येच खेळला जायचा. मात्र आता खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकांना कळू लागला आहे. तुम्ही कबड्डीची सर्वात मोठी स्पर्धा प्रो कबड्डी बद्दल ऐकलंच असेल. सध्या ही स्पर्धा सुरू आहे. तुम्ही सर्वांनीच लहानपणी कबड्डी खेळ नक्कीच खेळला असेल. जास्त करून पुरुष कबड्डी खेळताना पाहिले जातात. काही ठिकाणी मुली देखील उत्कंठेने हा खेळ खेळतात. मात्र तुम्ही कधी महिलांना कबड्डी खेळ साडी नेसून खेळताना पाहिलाय का? होय..हे खरंय. सध्या सोशल मीडियावर असाच एक महिलांनी साडी नेसून कबड्डी खेळल्याचा व्हिडिओ व्हाररल होतोय. जो पाहून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. साडी नेसून सुद्धा प्रत्येक एकापेक्षा एक महिला उत्तम खेळ खेळत आहेत.
व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच पाहू शकता की महिला साड्या नेसून सुदधा कबड्डी कशा उत्तम प्रकारे खेळत आहेत आणि प्रेक्षक देखील त्यांचा जबरदस्त खेळ पाहण्यासाठी व्यस्त आहेत. आजूबाजूची लोकही त्यांना प्रोत्साहन देत आहेत आणि महिलाही एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळत असल्याप्रमाणे खेळण्यात व्यस्त आहेत. ही महिला कबड्डी छत्तीसगढिया ऑलिम्पिकचा भाग असल्याचे सांगितले जात आहे. खरं तर छत्तीसगडच्या पारंपारिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्तीसगढिया ऑलिम्पिक सुरू करण्यात आले आहे.
( हे ही वाचा: आनंद महिंद्रा यांनी खरेदी केली Scorpio- N कार; ट्विटरवर फोटो शेअर करत म्हणाले “चांगले नाव सुचवा…” लोकांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया)
महिलांचा जबरदस्त कबड्डी खेळाचा व्हिडिओ एकदा पाहाच
( हे ही वाचा: नशीब फळफळलं! नोएडातील व्यक्ती एका झटक्यात बनली लखपती; उत्खननात सापडला इतक्या लाखांचा मौल्यवान हिरा)
महिलांचा हा भारावून टाकणारा कबड्डी खेळाचा व्हिडिओ आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला असून, ‘हम किसी से कम है क्या.. छत्तीसगढिया ऑलिम्पिक महिला कबड्डी’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. हा व्हिडीओ ५१ सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेला आहे, तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाईकही केले आहे आणि विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.