सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी लोकं अशाप्रकारचे व्हिडीओ करत असतात. या प्रसिद्धीच्या वेडेपणापायी काही लाइक्स आणि व्ह्युजसाठी तरुण, तरुणी भररस्त्यात अश्लील प्रकार करू लागतात. मग त्यांना आजूबाजूचं भानही उरत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक तरुणी कोणत्या रस्त्यावर किंवा ट्रेनमध्ये नाही, तर चक्क स्मशानभूमीत डान्स करताना दिसतेय.

स्मशानात अश्लील डान्स

सध्या एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका तरुणीने फक्त एका रीलसाठी हद्दच पार केली आहे. व्हिडीओत आपण पाहू शकतो की, तरुणी चक्क स्मशानभूमीत डान्स करताना दिसतेय. त्या स्मशानभूमीत अस्थी ठेवलेल्या दिसतायत. तिथेच समोर ती अश्लील डान्स करताना दिसतेय. अशा ठिकाणी बॉलीवूड गाण्यावर तरुणी थिरकत असताना अचानक एक वेगळाच आवाज आलेला व्हिडीओमध्ये दिसतोय. हा आवाज ऐकताच तरुणी घाबरते आणि डान्स करणं थांबवते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @comedy._station या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्याला परत जिवंत केल्याशिवाय ही बाई शांत बसणार नाही, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच याला दोन लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “जागा हटके निवडली आहे”, तर दुसऱ्या युजरने “ताई, त्याला तिथे तरी सुखाने राहू दे, तो तुझ्यामुळेच तिथे गेला असेल” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “मेलेल्या माणसांनापण सोडत नाहीत या बाया, तर जिवंत माणसांना काय सोडणार, देवा कसं होणार आमचं”; तर एकाने संतप्त होऊन “हिने तर लाजच सोडली” अशी कमेंट केली.

Story img Loader