ट्रेनचा प्रवास म्हणजे टेन्शन, असं अनेकांना हल्ली वाटू लागलंय. लांबच्या प्रवासासाठी आधीच तिकीट काढून ठेवा. तिकीट मिळालं नाही, तर ‘तत्काळ’साठी धडपड करा. तेही नाही, तर दाराजवळ उभं राहून प्रवास करा. अशा प्रकारे दर दिवशी लाखो लोक ट्रेननं प्रवास करतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यादरम्यान ट्रेनमध्ये अनेक घटनाही घडतात, ज्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो, तर काही व्हिडीओ पाहून पोट धरून हसायला येतं. सध्या ट्रेनमधील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात ट्रेनमध्ये जागा नाही म्हणून एका व्यक्तीनं चक्क ट्रेनमध्येच झोपाळा बांधलाय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, ट्रेनमध्ये खूप गर्दी आहे. अशातच एक व्यक्ती या गर्दीनं भरलेल्या ट्रेनमध्ये बसण्यासाठी एक अनोखा जुगाड करताना दिसते. ट्रेनमध्ये जागा नसल्या कारणानं एक तरुण चक्क एका कपड्यानं ट्रेनमध्येच झोपाळा बांधतो. या झोपाळ्यात तो आरामात झोपून आपला प्रवास करतो. यादरम्यान अचानक झोपाळ्याची गाठ सुटते आणि तरुणाचा तोल जातो. पण, याच वेळेस खालच्या सीटवर बसलेल्या काकांना या तरुणाचा जोरात धक्का लागतो. या सगळ्यामुळे ते काका वैतागतात. झोपाळा बांधलेल्या व्यक्तीवर लोक खूप रागावतात आणि त्याला बुक्क्यांनी मारतात.
हा व्हायरल व्हिडीओ @itsatrangimemer या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर या व्हिडीओला तब्बल ७.३ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.
हेही वाचा… आता फक्त भावाचीच हवा; भर वर्गात केलं असं काही की पोरी झाल्या फिदा; VIDEO एकदा पाहाच
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर भरभरून प्रतिसाद दिला आहे. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “चाचा आधीच घाबरले होते.” तर दुसऱ्याने “काकांनी एकदम बरोबर केलं”, अशी कमेंट केली.
दरम्यान, याआधीही ट्रेनमध्ये झोपाळ्याचा असा स्टंट अनेकांनी केला आहे. असेच व्हिडीओ पाहून अशा स्टंट करणाऱ्यांची संख्या वाढत चाललीय. सध्या व्हायरल झालेला हा व्हिडीओ मात्र खूप चर्चेत आहे.