Metro Viral Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात; तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. असे व्हिडीओ पाहून आपल्याला कधी कधी वाटतं की, या कलियुगात माणुसकी मरत चाललीय. सगळेच एकमेकांच्या जीवावर उठले आहेत आणि प्रत्येक जण फक्त स्वत:च्याच आयुष्यात गुंतत चालला आहे. पण, काही व्हिडीओ असेही असतात की, ज्यात माणुसकीचं दर्शन होतं. त्यामुळे माणुसकी अजूनही जिवंत आहे यावर विश्वास बसतो. सध्या असाच एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी एका तरुणाच्या मदतीसाठी धावून जाते.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण मेट्रोमध्ये उभा असल्याचे आपण पाहू शकतो. बसायला जागा न मिळाल्याने तो तरुण तसाच तासन् तास उभा होता. तेवढ्यात तरुणाला अचानक चक्कर येते आणि तो खाली कोसळतो. तेवढ्यात समोर उभ्या असलेल्या तरुण मुलीने त्याला मदत केली. खाली पडलेल्या तरुणाला उठून उभे राहण्यासाठी मदत केली. त्याची विचारपूस करून, तरुण मुलीने स्वत:च्या बाटलीमधले पाणी त्याला प्यायला दिले.
हेही वाचा… शेवटी आई ती आईच! मुलाला वाचवण्यासाठी आईने सर्वस्व पणाला लावलं, पाहा VIDEOमध्ये नेमकं काय घडलं?
तरुणाला चक्कर आलेली पाहून एक महिला व पुरुष जागेवरून उठले आणि त्या दोघांनी त्याची सीटवर बसण्याची सोय केली. या व्हिडीओत तरुणाच्या डोळ्यांत अश्रू आल्याचेही पाहायला मिळतेय.
हा व्हिडीओ @shoyebprank01 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला तब्बल ८.२ दशलक्ष व्ह्युज आले आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे ते अजूनही अनिश्चित आहे.
हेही वाचा… VIDEO: “ऐ, आधी काच खाली घे मग पुढचं बोल”, पुण्यात रिक्षाचालकाची दादागिरी; भररस्त्यात काय केलं पाहा
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एकाने कमेंट करीत लिहिले, “आजही दुनियेत प्रेम आणि मदत करणारे लोक आहेत.” तर, दुसऱ्याने “ही मुंबई आहे. मला वाटतं फक्त मुंबईतील लोक मदत करतात”, असे म्हटले आहे. “मुलीचा आदर करावा तितका कमी आहे,” अशीही कमेंट एकाने केली. तर एक जण म्हणाला, “मुलीच्या मदतीशिवाय बाकीची माणसं फक्त बघतच राहिली.”
दरम्यान, @shoyebprank01 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हिडीओ शेअर केलेल्या युजरचे नाव शोएब असे आहे. या तरुणाने हा व्हिडीओ एक प्रँक म्हणून शूट केल्याचे समजले जातेय. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर असे अनेक व्हिडीओ आहेत; जिथे तो माणुसकी जिवंत आहे का बघण्यासाठी असे प्रँक करतो.