जस्टिन बीबर हे नाव तसं इंग्लिश म्युझिकच्या चाहत्यांमध्ये फूट पाडणारं आहे. लोकांना तो एकतर जाम आवडतो, नाहीतर बिलकुल नाही. अध्येमध्ये काही नाही. आणि या दोन परस्परविरोधी गटामधल्या लोकांची मतंसुध्दा कट्टर. जस्टिन बीबर आवडणारा गट त्याचा फुल भक्त. तर विरोधी पार्टी या बीबरविषयी भलत्याभलत्या शंका घेत त्याला ‘किस झाड की पत्ती’ ठरवण्यात कायम मश्गूल.
अजून सुधरलं नसेल कोण, तर बघा बाबांनो जस्टिन बीबरला एकदा….
1990च्या दशकापासून पुढे इंग्लिश म्युझिकचे चाहते झालेल्या लोकांना हा जस्टिन बीबर बिलकुल आवडत नाही. ‘आमच्या वेळेला यापेक्षा कितीतरी चांगली गाणी होती’ असं हे आता पंचविशीच्या आसपास असणारे समीक्षक म्हणत असतात.
पण आताच टीनएजमध्ये प्रवेश करणारे तरूण आणि विशेषत: तरूणींमध्ये जस्टिन बीबर जाम म्हणजे जाम फेमस आहे. त्याचा आवाज फुटायच्या आधीपासूनच्या वयात जगात फेमस झालेल्या बीबरची आतापर्यंतची सगळी गाणी या लोकांना तोंडपाठ आहेत आणि जस्टीन बीबरच्या एका ‘अदे’ने घायाळ वगैरे कसं व्हायचं याचं व्यवस्थित माहिती या सगळ्यांना आहे.
पण काही असलं तरी गुणगुणण्यासाठी आणि वेस्टर्न पध्दतीने ज्यांना गाणं शिकायचं आहे अशा कमी वयाच्या गायकांसाठी सुरूवात म्हणून जस्टिन बीबरची गाणी चांगली आहेत.
इंटरनेटवर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात बुरखा घातलेल्या दोन मुली जस्टिन बीबरचं ‘बेबी’ हे गाणं म्हणत आहेत. बछघा पुढचा व्हिडिओ:
व्हिडिओ सौजन्य – फेसबुक
या दोन्ही मुली हे गाणं खूपच छान पध्दतीने म्हणत आहेत. आणि ज्यांना वेस्टर्न पध्दतीच्या गायनाची थोडीफार जाण आहे त्यांना हेही कळेल की या गाण्यातले ‘सेकंड्स’चे स्वरसुध्दा या मुली चांगल्याच सफाईने गात आहेत. आणि त्यांच्यासोबत असणारी एक मोठी मुस्लीम महिला एका छोट्याशा ‘वाद्या’वर ताल धरत या मुलींना साथ देते आहे. या मुली पाकिस्तानी आहेत आणि आतापर्यंत साहजिकच त्यांचं हे गायन जगभर प्रसिध्द झालंय.
एकूणच जस्टिन बीबरच्या ‘बेबी’चं हे ‘देशी व्हर्जन’ चांगलंच फेमस ठरलंय.