Old Lady With Firecrackers: सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. अनेक वेळा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होतात. हे व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचं चांगलं मनोरंजन होतं. कधी प्राण्याचे, तर कधी काही विचित्र व्हिडीओ व्हायरल होतात आणि चर्चेत विषय ठरतात. सध्या अशाच एक आजीबाई चर्चेचा विषय बनल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या आजीबाईंच्या व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्की थक्क व्हाल, एवढं मात्र नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळत्या फटाक्यांच्या माळा घेऊन स्टंट –

दिवाळी, नवीन वर्ष, लग्न याशिवाय अनेकदा लोक आनंदाच्या क्षणी उत्साह वाढवण्यासाठी फटाके फोडताना दिसतात. दरम्यान नेहमीच फटाके वाजवताना आपल्याला लहान मुले, तरुण मुले दिसतात. अगदी न घाबरता ही मुलं मोठ मोठे फटाके फोडतात. काही तरुणांना आपण अनेकदा असे फटाके हातात घेऊन स्टंटबाजी करताना पाहिलं आहे. मात्र कधी वयस्कर आज्जीला असे फटाके हातात घेऊन स्टंटबाजी करताना पाहिलंय का ? नाही ना. हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ बघा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक पिवळी साडी नेसलेली वयस्कर आज्जी अगदी बिंधास्तपणे जळत्या फटाकड्याची माळ हातात घेऊन स्टंट करत आहे. या आज्जीच्या चेहऱ्यावर जराही भीती दिसत नाहीय.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Viral video: भर लग्नात नवरदेवानं लावला भावी पत्नीच्या अफेअरचा व्हिडिओ; पुढे जे झालं…

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ केरळमधील असल्याचं सांगितला जात आहे. @evershining_media या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले असून अनेक नेटकऱ्यांनी जोरदार कमेंटही केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिले आहे की, सुपर अम्मा! तर दुसर्‍या युजरने गंमतीने दादी रॉक, नेबर्स शॉक अशी कमेंट केली आहे. तर तिसर्‍याने ती रजनीकांतची आजी आहे असा मजेशीर टोला लगावला आहे.