Viral Video: तुम्ही आतापर्यंत लैला-मजनू, रोमिओ-ज्युलियट यांच्या अजरामर प्रेमकथा ऐकल्या असतील. खरंच प्रेम ही एक गोड भावना आहे. जी व्यक्ती प्रेमात पडते, तेव्हा ती प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असते; प्रेमाचे असे अनेक किस्से आपण बऱ्याचदा ऐकले किंवा पाहिले असतील. पण, हल्ली समोर येणाऱ्या अनेक घटनांमध्ये कधी, कोण, कोणाच्या प्रेमात पडेल हे सांगता येत नाही. तसं पाहायला गेलं तर प्रेम कधीही जात, धर्म, रंग, रूप, वय पाहून केलं जात नाही. पण, अलीकडे समोर येणाऱ्या घटनांमध्ये वृद्ध व्यक्ती तरुणींच्या प्रेमात तर कधी वयस्कर महिला तरुणांच्या प्रेमात पडलेल्या पाहायला मिळतात. आताही अशीच एक घटना समोर आली आहे.

जग प्रगतीच्या मार्गावर चालत असले तरीही दररोज नवनवीन घटना आपल्या कानांवर पडतात, ज्या आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडच्या असतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये चक्क एका बापाने त्याच्याच मुलीशी लग्न केल्याचे म्हटले होते. अशा सुन्न करणाऱ्या घटना पाहिल्या की हळूहळू नात्यांवरचा विश्वासही कमी होऊ लागतो. याचदरम्यान एक नवा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक वृद्ध व्यक्ती आणि तरुणी अखंड प्रेमात बुडालेले दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका गल्लीमध्ये एक तरुणी कोणाची तरी वाट बघत उभी राहिलेली दिसते, तेवढ्यात एक वयस्कर व्यक्ती तिथे येते, त्या व्यक्तीला पाहून तरुणी तिला घट्ट मिठी मारते. त्यानंतर ती वृद्ध व्यक्ती चक्क तिला उचलून घेते आणि तिथे असलेल्या स्कुटीवर बसवते. त्यानंतर गुडघ्यावर बसून तिच्याशी गप्पा मारते आणि पुन्हा उभं राहून तिला मिठी मारते. इतक्यात हा व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती वरून त्यांच्या अंगावर पाणी ओतते, त्यानंतर हे दोघेही पळून जातात.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @memesbyakmishra या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर अनेक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट्स करताना दिसत आहेत.

एकाने लिहिलंय की, “तरुणीला एखादा तरुण भेटला नाही का?”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “म्हतारा जरा जास्तच चालू दिसतोय”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “हा वेड्यांचा बाजार आहे.”