देशाने कितीही प्रगती केली तरी महिलांच्या सुरक्षिततेबाबत आजही प्रश्न आहेत. पोलीस प्रशासन २४ तास तैनात असताना देखील महिलांसोबत गैरव्यवहार केल्याच्या घटना समोर येतात. अनेक ठिकाणी आजही स्त्रियांवर अत्याचार केले जातात. त्यांच्यासोबत अश्लील वागणूक केली जाते. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आलाय, परंतु कौतुकास्पद बाब म्हणजे या मुलीनी छेड काढणाऱ्या वृद्धाला चांगलाच धडा शिकवला. तीनं या वृद्धला अशी अद्दल घडवली की ते पुन्हा कोणत्या मुलींकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही.याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक मुलगी एका वृद्धाला चपलेने जोर जोरात मारत आहे. ही मुलगी प्रचंड चिडलेली दिसत आहे. त्यामुळे यावरुन असा अंदाज लावला जात आहे की, त्या व्यक्तीने मुलीशी गैरवर्तन केले होते. व्हिडीओत दिसणारी मुलगी वृद्धाला मारतच चालली आहे, दरम्यान तिसरा व्यक्ती येतो आणि तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Video: चक्क जिवंत माणसाला लावली आग, विचित्र मसाजची पद्धत पाहून व्हाल थक्क
@gharkekalesh नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.सोशल मीडियावर अशा भांडणांचे, मारामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.