दररोज सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यामध्ये प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. अनेकवेळा हे व्हिडीओ पाहून आश्‍चर्य वाटते आणि काही व्हिडीओ बघून आपल्याला हसू येते. असाच एक प्राण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.अनेकांना प्राण्यांशी खेळायला त्याच्ंयाशी मस्ती करायला खूप आवडतं. परंतु प्राण्यांनाही मन असतं हे ते विसरतात. आपल्याला कोणी चिडवलं की आपल्याला खूप राग येतो. एका मर्यादेपर्यंत आपण हे चिडवणं ऐकून घेतो पण नंतर आपण सहन करत नाही. तसंच आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही भावना असतात आणि त्यांनाही राग येऊ शकतो. मग ते चांगलाच इंगा दाखवत सर्वशक्तीनिशी समोरच्याला धडा शिकवतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये खेकड्यानं एका वृद्ध व्यक्तिला चांगलाच धडा शिकवला आहे.

खेकड्याशी मस्ती करणं आलं अंगलट –

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक वृद्ध व्यक्ती खेकड्याला हातात पकडून त्याच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानं खेकड्याला अगदी त्याच्या तोंडासमोर आणलं आहे. खेकड्याची एक नांगी पकडून त्याच्यासोबत खेळत आहे. असं करताना त्याला जराही भिती वाटत नाहीय. तो बिंधास्त त्याच्यासोबत खेळत आहे. मात्र हे सगळं खेकड्याला आवडलेलं दिसत नाही. दरम्यान खेकडा अचानक त्या वृद्ध व्यक्तीचं नाक आपल्या नांग्यांनी पकडतो. यानंतर त्या व्यक्तीला प्रचंड वेदना होत असून तो मोठ मोठ्यानं ओरडायला लागतो आणि खेकड्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न करतो. मात्र खेकडा काही त्याचं नाक सोडत नाही. नंतर हा व्यक्ती अतिशय ताकदीनं खेकड्याला पकडून बाजूला करतो. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी धक्का बसला आहे. अशा प्रकारे प्राण्यांशी खेळणे कसे अंगलच येऊ शकते हे या व्हिडीओवरुन कळते.

small kids Viral Video
‘वाघ गुर्रS गुर्रSS करतोय अन् रक्त पितोय…’ जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्याने गावरान भाषेत सांगितला किस्सा; VIDEO पाहून हसाल पोट धरून
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Dog Killed Crocodile Animal Video Viral Dog Fight With Crocodile Who Will Win Watch This Video Till End
VIDEO: “हिम्मतीपुढं सगळं शक्य” मगरीनं कुत्र्याला जबड्यात पकडला मात्र ५ सेकंदात डाव पलटला; लढाईचा शेवट पाहून तुम्हीही व्हाल हैराण
Parrot talking in english fight with women funny video viral on social media
VIDEO: पोपटाची हुशारी पाहिली का? मालकिणीला सर्दी झाल्यानंतर लावतोय लाडीगोडी; अ‍ॅक्टींग पाहून पोट धरुन हसाल
Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
Dog Vs Chicken Fight See Who Will Win Animal Video Viral surprise after result dog scared from this bird watch viral video
“हरला तोच आहे, जो लढला नाही” कुत्रा करत होता कोंबड्याची शिकार पण १० सेकंदात पलटली बाजी; VIDEOचा शेवट पाहून व्हाल थक्क
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – शंभर टक्के व्हेज बटर चिकन? मेन्यूचा स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल

या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्युज गेले आहेत. तर नेटकरी अनेक प्रतिक्रिया व्हिडीओवर देत आहेत.

Story img Loader