Viral Video: समाजमाध्यमामुळे अनेक नवनवीन व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. यातील काही व्हिडीओ पाहून आपण हसतो, आपले मनोरंजन होते; तर काही व्हिडीओंमुळे आपण भावनिक होतो. सध्या असाच एक भावूक करणारा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यात असं काहीतरी पाहायला मिळतंय, जे पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.

जगात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू निश्चित असतो. कधी, कोणत्या क्षणी मरण येईल हे कोणीही सांगू शकत नाही. मग ती एखादी व्यक्ती असो किंवा प्राणी असो. आजपर्यंत आपण असे अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील, ज्यात नकळत अनेकांच्या मृत्यूच्या घटना कॅमेऱ्यात कैद झालेल्या तुम्ही पाहिल्या असतील. आतादेखील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीला त्याचा मृत्यू जवळ आल्याचे दिसत आहे; पण असं काही होतं जे पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल.

सध्या व्हायरल होत असलेली ही घटना सीसीटीव्हीमधील असून या व्हिडीओमध्ये एक रेल्वे पोलिस स्थानकावरील फलाटावर उभा राहिलेला दिसत आहे. यावेळी त्याच्यापासून जवळपास चार-पाच फुटांच्या अंतरावरून एक रेल्वे वेगाने जाताना दिसत आहे. शांत एकाजागी उभ्या राहिलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अचानक काहीतरी दिसू लागतं, यावेळी जणू काहीतरी त्याच्या भोवती गोल गोल फिरत आहे, त्यामुळे तो देखील तशाच पद्धतीने गोल गोल फिरतो आणि नंतर एक हात वर करून मागे जातो आणि जमिनीवर कोसळून सरळ धावत्या ट्रेनच्या खाली पडतो आणि मरण पावतो.

पाहा व्हिडीओ:

अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @heart_hacker_shahzaad या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत सहा लाखांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच त्यावर अनेक युजर्स अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

या व्हिडीओखाली एका युजरनं लिहिलंय, “खूप वाईट आहे हे” दुसऱ्या व्यक्तीनं लिहिलंय, “त्याचे कुटुंबीय किती दुःखात असतील” तिसऱ्या व्यक्तीनं लिहिलंय, “मृत्यू कधीही येऊ शकतो”, आणखी एका व्यक्तीनं लिहिलंय, “बापरे, खूप भयानक.”