Bappa Viral Video: जेव्हापासून सोशल मीडियावर रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू आहे, तेव्हापासून लोक विविध विषयांवरील आधारित कटेंटच्या शोधात असतात. नवनवीन गाणी, चित्रपट, सण-समारंभाच्या क्षणी लोक आवर्जून व्हिडीओ बनवतात. सध्या देशभरात गणेशोत्सव साजरा केला जात असून यादरम्यानचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु, आता असाच एक व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे, ज्यातील दृष्य पाहून नेटकरी यावर अनेक कमेंट्स करत आहेत.

गणेशोत्सव म्हटलं की सगळीकडे उत्साह, आनंद अन् सकारात्मकतेचं वातावरण पाहायला मिळतं. बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचा प्रत्येक क्षण बाप्पाचे भक्त मनमुरादपणे जगतात, बाप्पाचा आशीर्वाद घेतात. खरं तर बाप्पाच्या येण्याची सगळेच आतुरतेने वाट पाहतात. पण, हल्लीचे लोक बाप्पाचे दर्शन घेण्याआधी त्याचा फोटो, व्हिडीओ काढण्यात मग्न असतात. काळ बदलला तशी माणसं, त्यांचे विचारही बदलले हेच खरं आहे. पूर्वीचा गणेशोत्सव भक्तीभावाने साजरा केला जायचा. पण, हल्ली सगळे सण फक्त दिखावा म्हणून साजरे केले जातात. सध्या अशीच गोष्ट दाखवणारा व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे.

Bride beautiful dance
‘नवरीने वरात गाजवली…’ स्वतःच्या लग्नात घोड्यावर बसून केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
middle-class father video
‘बाप असेल त्या परिस्थितीत आनंदी राहायला शिकवतो…’ मध्यमवर्गीय बापाचा सुंदर VIDEO एकदा पाहाच…
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Video Shows Man cleverness
थरारक! काही सेकंदांत होत्याचं नव्हतं झालं असतं; ‘तो’ रस्ता ओलांडत असताना वेगानं आली कार अन्… पाहा धडकी भरवणारा VIDEO
Is Selling Fruits On The Footpath In Pune Watermelon seller's video
पुणे तिथे काय उणे! कलिंगड विकण्यासाठी विक्रेत्याची भन्नाट आयडिया; VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Makar Sankranti 2025 Funny video of a kid flying a kite with pants falls down viral video
याला म्हणतात नाद! पँट खाली आली पण पतंग नाही सोडली; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Little school girl driving jcb as passion video viral on social media dvr 99
लेक असावी तर अशी! शेतकरी बापाच्या मुलीची ‘ही’ कला पाहून तुम्हीही व्हाल अवाक, VIDEO एकदा पाहाच

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गणपतीच्या मोठ्या मूर्तीचे आगमन होत असून यावेळी बाप्पाला पाहण्यासाठी अनेक जण गर्दी करतात. पण, यावेळी या गर्दीतील लोक बाप्पाच्या पाया न पडता फक्त त्याचे फोटो आणि व्हिडीओ काढतात. या व्हिडीओवरूनच लक्षात येईल की हल्लीच्या लोकांमध्ये आणि पूर्वीच्या लोकांमध्ये किती फरक आहे. या व्हिडीओवर, अरे… मूर्खांनो हात पण जोडा, असं लिहिण्यात आलं आहे.

हा व्हिडीओ @buntyyyy_05 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून त्याला दोन मिलियन व्ह्यूज मिळाल्या असून दीड लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. युजर्स यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘आली गं गौराई सोनपावली आली…’ सुंदर एक्स्प्रेशन्स देत चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “बाईSS खूपच गोड”

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने लिहिलंय की, अरे मग ज्याने हा व्हिडीओ काढलाय त्याला पण हे सांगा. तर दुसऱ्याने लिहिलंय की, भावा तू काय करतोयस मग?, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “हे कलियुग आहे.”

Story img Loader