सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ आपल्याला थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून तो व्हिडीओ बघून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवरती विश्वास बसणार नाही. कारण, एखाद्या इमारतीचा जीना चढताना आपल्याला बऱ्याचदा दम लागतो किंवा जीव नकोसा होतो अशातच जर आपल्या हातामध्ये काही सामान असेल तर तो जीना चढताना दुप्पट त्रास होतो.
मात्र, आता तुम्ही जो व्हिडीओ पाहणार आहात त्यामध्ये एक व्यक्ती त्याच्या सहकाऱ्याला चक्क आपल्या डोक्यावर घेऊन जीना चढताना दिसत आहे. पण त्यापेक्षाही गमतीदार किस्सा म्हणजे तो त्याला आपल्या डोक्यावरुन उलटा घेऊन चालताना दिसतोय. या व्हिडीओमधील व्यक्ती त्याच्या डोक्यावर अगदी मिरर इमेज वाटावी याबद्दतीने मित्राला शिर्षासनाप्रमाणे उलटं उभं करुन त्याचा भार वाहून नेत जीना चढताना दिसतं आहे. त्यामुळे त्यांनी डोक्याला गम वगैरे लावला आहे की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
आणखी वाचा- Video: दारूच्या नशेत चौघींनी मिळून एकीला बेदम मारले; भररस्त्यातच सुरू केला लाथेचा आणि बेल्टचा मार
मात्र, तसं काहीही नाहीये रेडीएटवर (Reddit) शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती त्याच्या सहकाऱ्याला आपल्या डोक्यावरती घेताना दिसतो आहे. तो आधी आपल्या सहकाऱ्याला उचलून घेत त्याचे डोके आपल्या डोक्याला लावतो. त्यानंतर त्याचा सहकारी देखील आपला तोल साधत मित्राचा हात सोडून देतो आणि मग ते अनेक पायऱ्या चढत आहेत.
पण आश्चर्याची बाब म्हणजे जिन्यावर चढताना आपल्या सहकाऱ्याला डोक्यावर उलटं घेत आपल्या हातांचा आधार देखील मित्राला देत नाहीये तरी देखील ते दोघे कोणत्याही अडथळ्याशिवाय तो जीना चढून वरती जात आहेत.
हा व्हिडीओ बघून ते दोघे आपला तोल एवढा वेळ कसा काय सांभाळू शकतात असं आश्चर्य नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. तर या व्हिडीओसाठी नेटकऱ्यांनी दोघांचेही तोंडभरुन कौतुक केलं आहे. “लोक जेव्हा त्यांचे डोके एकत्र ठेवतात तेव्हा आपण काय साध्य करू शकतो खरंच हे आश्चर्यकारक आहे.” अशा प्रतिक्रिया या नेटकऱ्यांकडून या व्हिडीओवर येत आहेत