Petrol pump accident viral video: सोशल मीडियावर रोज मोठ्या प्रमाणात अपघाताचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही वेळा चालकांच्या चुकीमुळे होतात त कधी रस्त्यावरील खड्ड्यांमउळे. दरम्यान अशाच एका अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये डायव्हरच्या एका चुकीमुळे अख्ख्या पेट्रोल पंपाला आग लागली आहे. पेट्रोल पंपावर झालेल्या अपघाताचा धक्कादायक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आला असून, तो वेगाने व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चालकाच्या छोट्याशा चुकीमुळे ही घटना घडल्याने पेट्रोल पंपाला अचानक आग लागली आहे. आग लागल्याचे समजताच परिसराक घबराट पसरली, अनेकांनी घाईघाईने आपली वाहने सोडून दिली, तर पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी तत्काळ मध्यस्थी करून अग्निशमन बंबाच्या मदतीने आग विझवली. इंटरनेटवरील यूजर पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांच्या शहाणपणाचे कौतुक करत आहेत. हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत ४१ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

हा व्हायरल व्हिडीओ चीनमधला आहे, ज्यात १ सप्टेंबर रोजी हा अपघात झाला होता. व्हिडिओनुसार, अद्याप कोणत्याही नुकसानीची माहिती समोर आलेली नाही. पेट्रोल पंपावर झालेल्या या भीषण अपघातामुळे लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आग विझवणाऱ्या पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांचेही नेटिझन्सनी कौतुक केले. एका वापरकर्त्याने पेट्रोल पंपांच्या सुरक्षा नियमांची तुलना युनायटेड स्टेट्सच्या सुरक्षेशी केली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Jugad Video: झोपण्याआधी केळी, अंडी एकत्र मातीत गाडा; सकाळी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

जगभरात दररोज शेकडो लोक अपघातांना बळी पडतात. अपघातात कुणी किरकोळ जखमी होतं, कर कुणाला जीव गमवावा लागतो. रस्त्यावर अपघात होण्याची अनेक कारणे आहेत. गेल्या महिन्यात रशियातही अशीच एक घटना समोर आली होती, ज्यात ३५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video on social media of petrol pump fire for small mistake of driver trending srk