Viral Video Today: सुडाची भावना माणसाला कोणत्याही थराला जाण्यास भाग पाडू शकते हे आपणही ऐकले असेल, आता याचं ताजं उदाहरण सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ऑनलाईन व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका इसमाने चक्क एका महागड्या आलिशान मर्सिडीज कारला आग लावल्याची घटना समोर आली आहे. हा व्हिडीओ पाहून सुरुवातीला तुम्हालाही या व्यक्तीचा राग येऊ शकतो. एखाद्याच्या मेहनतीने घेतलेल्या वस्तूची नासधूस करणारा हा व्यक्ती किती निर्दयी आहे असाही प्रश्न पडेल पण जेव्हा त्याचे कारण ऐकाल तेव्हा कदाचित त्याच्याविषयी आत्मीयता वाटू शकते.चला तर मग नेमकं हे प्रकरण काय आहे हे सविस्तर जाणून घेऊयात..
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एक व्यक्ती मर्सिडीज कार पेटवताना दिसत आहे. प्राप्त माहितीनुसार, या व्यक्तीने आलिशान कार जाळली आणि कार पेट घेऊ लागताच तात्काळ तिथून पळ काढला. सीसीटीव्हीही फुटेज समोर आल्यापासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर आगीप्रमाणे व्हायरल होत आहे.
Video: अपघातग्रस्त वेदनेने कळवळताना रिक्षावाले थांबेना इतक्यात JCB आला अन…पाहा थक्क करणारा क्षण
नोएडा पोलिसांनी या व्यक्तीला सध्या ताब्यात घेतले आहे रणवीर असे या गुन्हेगाराचे नाव असून तो गवंडी आहे, त्याला मर्सिडीज कारच्या मालकाने काही दिवसांपूर्वी त्याच्या राहत्या घरी फरशा बसवण्याचे काम दिले होते. काम पूर्ण झाल्यावर मात्र मालकाने त्याला पैसे देण्यास टाळाटाळ केली. शेवटी पैसे न देणाऱ्या मालकाचा बदला घेण्यासाठी या रणवीरने त्याच्या महागड्या मर्सिडीजला आग लावली. मालकाने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर काही वेळातच रणवीरला ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी या कामगाराची बाजू घेते श्रीमंतांना गरिबांचे हाल दिसत नाहीत व त्यांच्या हक्काचे पैसे न दिल्याने अशीच वागणूक द्यायला हवी अशा कमेंट केल्या आहेत. तर काहींनी कायदा हातात घेणाऱ्या गवंडी कामगाराला चूक दर्शवत मालकानेसुद्धा वेळेत पैसे द्यायला हवे होते अशी भूमिका मांडली आहे.
मर्सिडीज पेटवली, पाहा व्हायरल व्हिडीओ
मागील काही दिवसात नोएडामधून गरीब श्रीमंत वादाचे अनेक किस्से समोर आले आहेत. कधी सोसायटीचे दार उघडण्यास उशीर झाल्याने सुरक्षा रक्षकाला महिलेने मारहाण करणे तर कधी लिफ्टमध्ये स्वतःच्या चुकीने अडकूनही वॉचमनला मारहाण करणे असे सर्व प्रसंग ताजे असताना आता ही नवी घटना चर्चेचा विषय ठरत आहे.