Viral Wedding Video: आपला लग्नसोहळा खास व्हावा यासाठी प्रत्येक जण अगदी शक्य तेवढे सर्वच प्रयत्न करत असतो. नवरा-नवरीच्या एंट्रीपासून ते जेवण, सजावट, लाईट्स सगळं काय ए-१ करण्यासाठी वर्षानुवर्षे तयारी केली जाते. अलीकडे ख्रिश्चन लग्नात जशी नवरीच्या ड्रेसला मोठी ट्रेल (लांब जाळीचे किंवा विणकाम केलेले कापड) जोडली जाते तशीच फॅन्सी डिझाईन भारतीय वधूंच्या सुद्धा पसंतीस उतरत आहे. डोक्यावर घ्यायचा पदर हा मागून लांबलचक ठेवून हा लुक आपण अनेक सेलिब्रिटींच्या लग्नात पाहिला असेल. प्रियांका चोप्रा, कतरिना यांनीही ही स्टाईल फॉलो केली होती. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तर नवरोबांनाही या फॅशनची भुरळ पडली आहे. त्यातही Swag असा भन्नाट की त्याने कापड नव्हे तर चक्क नोटांचा लांब लचक हार बनवून घातला आहे.

प्रत्येक लग्नासाठीचा स्वप्नवत हार असे कॅप्शन देऊन हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच हा विवाह सोहळा पार पडला होता त्यावेळी फोटोग्राफर आलिया या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होऊ लागला.

एकीकडे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले असताना हा नवरदेव नेमका एवढे पैसे कुठून घेऊन आला असाही प्रश्न अनेकांनी गंमतीत केला आहे.हाच तो व्यक्ती जो पाकिस्तानला आता आर्थिक संकटातून बाहेर काढू शकतो अशा कमेंट्स या व्हिडीओखली पाहायला मिळत आहेत.

पाकिस्तानच्या नवरदेवाचा व्हायरल व्हिडीओ

Video: बाई जीव वाचव आणि पळ.. नवरदेवाने भरमंडपात केलेली ‘ही’ धुलाई पाहून नवरीची तुम्हालाही दया येईल

दरम्यान, तुम्हाला माहीत आहे का की भारतातही अशा प्रकारे पैशाच्या नोटांचे हार लग्नात घालण्याची पद्धत आहे, ही काही परंपरा नसून आपल्या संपत्तीचा दिखावा करण्याची पद्धत म्हणता येईल मात्र भारतीय रिझर्व्ह बँकेने हे प्रकार गैर असल्याचा इशारा दिला आहे. नोटांचा आदर केला पाहिजे,त्या देशाच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक आहेत आणि लोकांनी त्यांचा गैरवापर करू नये असे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले होते.

Story img Loader