Viral video: आपल्या प्रेमासाठी पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर आता भारतवासी झाली तरी तिच्या बद्दलच्या बातम्या काही थांबलेल्या नाहीत. सचिन आणि सीमा हैदरच्या लव्ह स्टोरीची आजही चवीने चर्चा होते. सध्या सीमा हैदर ही एखाद्या सेलिब्रिटीसारखी झालीये. सर्वत्र फक्त आणि फक्त सीमा हैदर हिच्याच नावाची जोरदार चर्चा आहे. सीमा हैदर ही सोशल मीडियावरही सक्रिय असते. पाकिस्तानमधून सीमा हैदर ही ज्यावेळी भारतामध्ये दाखल झाली. त्यावेळीचे अनेक व्हिडीओही तिने सोशल मीडियावर शेअर केले. इतकेच नाही तर सचिन याच्यासोबत धमाल करतानाचे देखील सीमा हैदर व्हिडीओ शेअर करते. अशातच आता सीमा लवकरच पाचव्या मुलाची आई होणार असल्याचे तिने व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तिच्या बेबी शॉवरचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून तुम्हीही शॉक व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं, असं म्हणत पाकिस्तानची सीमा हैदर आपल्या चार लेकरांना सोडून दोन्ही देशांची सीमा ओलांडत पाकिस्तानातून भारतात आली. पब्जी खेळत असताना झालेल्या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं अन् सचिनसाठी घरदार सोडून सीमाने प्रेमाची परिसीमा ओलांडली. हीच सिमा हैदर आता पाचव्यांदा आई होणार असून ओटी भरण्याच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्ये ती सांगत आहे की, मला आधी ४ मुले आहेत आणि आता पहिल्यांदा मी हा कार्यक्रम कसा असणार आहे हे बघणार आहे, मी याआधी हे सगळं कधीच बघितलं नाहीये पण आता सगळं बघणार आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सीमा साडी नेसून तयार आहे, अतिशय आनंदी दिसत आहे आणि तिने सांगितले ती डान्स करणार आहे. सध्या तिच्या संपूर्ण कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ seema____sachin10 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.सीमा हैदर काही वाईट हेतूने भारतात आल्याचा दावा काही नेटकरी करत आहेत. इतकंच नाही तर काहींनी सीमाला पाकिस्तानी गुप्तहेरही म्हटलं आहे. तर आणखी एकानं बाईईई काय हा प्रकार अशी प्रतिक्रिया दिली आहे.