Viral video: आजकालच्या मुलांकडे अभ्यास न करण्याची अनेक कारणं असतात. कधी आजारपण, कधी खेळ. प्रत्येक दिवशी मुलं नव-नवी कारणं शोधतात. पण टिक टॉकवर सध्या एका मुलाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्याचे अभ्यास न करण्याची कारणं ऐकून तुम्ही पोट धरुन हसाल. दरम्यान या सगळ्यात मुलांबरोबरच पालकांनाही मुलांच्या अभ्यासाचं गृहपाठाचं टेन्शन असतं. अशावेळी कधी कधी पालकांनाही या मुलांचा अभ्यास किंवा गृहपाठ पूर्ण करुन द्यावा लागतो.मात्र आता पालकांचंही आणि मुलांचंही हे टेन्शन कमी होणार आहे. आता तुम्ही म्हणाल अभ्यास तर केलाच पाहिजे मग हे कसं शक्य आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,जो पाहून प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचा ताण नक्की जाईल. याचं कारण असं की आता बाजारात चक्क होमवर्क करुन देणारी मशीनच आली आहे.
या होमवर्कचा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वही दिसत आहे. या वहीमध्ये काही वाक्य काही वेळात लिहिली जात आहे, मात्र तुम्ही नीट पाहिले तर दिसेल की कोणताहा विद्यार्थ्यी लिहिताना दिसत नाही तर एक मशीन आहे,जी मशीनच वहीमध्ये वाक्य लिहित आहे.
पालकांनो तुमचं मत सांगा
लहान मुलांना अभ्यास करण्यासाठी किती मागे लागावं लागतं हे तुम्हाला माहीतच असेल. अभ्यासाची वेळ टाळण्यासाठी वाट्टेल ती कारणं द्यायची मुलांची तयारी असते. बहुतेक मुलं अभ्यासाचं नाव काढताच रडायला सुरूवात करतात. उत्साहात अभ्यासाला बसतील अशी मुलं खूप कमी दिसून येतात. मात्र आता ही मशीन जर मुलांनी पाहिली तर कदाचीत या मशीनसाठीही ते पालकांकडे हट्ट करतील. पालकांनो आता तुम्हीच यावर तुमचं मत काय आहे ते सांगा.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> सावधान! बाजारात आलाय सिमेंटचा लसूण; महाराष्ट्रात फसवणुकीचा पर्दाफाश, VIDEO पाहून सांगा या लोकांना कोणती शिक्षा करावी
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @HasnaZaruriHai या अकाउटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये”लो भाई अब homework करने वाली मशीन भी या गई” असे लिहिण्यात आलेले आहे. या व्हिडीओवर आता नेटकरी वेगवेगळ्या फनी प्रतिक्रिया देत आहेत. कोणी म्हणतंय “आमच्या वेळी हे मशीन कुठे गेलेलं” तर आणखी एका युजरने केली आहे की, “भविष्य धोक्यात आहे मुलांचं, हे अशाप्रकारचं तंत्रज्ञान मुलांच्या भविष्याची वाट लावेल.”