रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये विध्वंसक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत लोकांना युक्रेन सोडून पलायन करण्यास भाग पाडण्यात आलं. रशिया युक्रेन युद्धाचा आज चौदावा दिवस आहे. युद्धाचा सर्वाधिक परिणाम झालेल्या ६ भागांमधून सामान्य नागरिकांना बाहेर पडता यावं म्हणून रशिया १२ तासांच्या युद्धबंदीसाठी तयार झाल्याचं युक्रेनच्या उप-पंतप्रधानांनी म्हटलंय. युक्रेनच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत युद्धविरामासाठी रशिया तयार झाल्याचं इरिना वेरेश्चुक यांनी म्हटलंय. त्यातच सोशल मीडियावर रशिया आणि युक्रेनमधील हल्ल्याचे वेगवेगळे व्हिडीओ समोर येत आहेत. आणखी एका नवा व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. या व्हिडीओमध्ये एका पोपटाने त्याच्या चोचीच्या मदतीने युक्रेनचा झेंडा फडकावलाय.

युक्रेनचा झेंडा फडकावणाऱ्या या पोपटाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अगदी वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. हा व्हिडीओ युक्रेनमधला असल्याचं सांगण्यात येतंय. हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलेल्या कॅप्शनवरून हा अंदाज लावण्यात येतोय. ‘सुप्रभात, आम्ही युक्रेनमधील रहिवासी आहोत’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक पोपट आपल्या चोचीच्या मदतीने युक्रेनचा झेंडा फडकावताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांना खूपच आवडला आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवरीचा डान्स पाहून भावूक झाला नवरदेव, लग्नाला आलेले पाहुणेही बघतच राहिले

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘छोरी पटाता है’ च्या रिमिक्स व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ, तुम्ही पाहिलाय का?

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ TsybulskaLiubov नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केला आहे. एक पोपट आपल्या चोचीच्या मदतीने युक्रेनचा झेंडा अगदी सहज फडकावत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. पोपटाचा रंग आणि युक्रेनच्या झेंड्याचा रंग सारखाच असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सोशल मीडिया यूजर्स या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. यावर एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, आम्ही युक्रेनसोबत आहोत. यावर कमेंट करताना दुसर्‍या यूजरने लिहिले की, आम्हाला युक्रेन फ्री बघायचं आहे.

Story img Loader