Viral Video Shows Men Recording While Riding Bike Meets with accident: वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक वाहन चालकाची जवाबदारी आहे. प्रत्येक वाहन चालकाने सीटबेल्ट लावणे, हेल्मेट घालणे, मद्यपान करून वाहतूक चालवणे टाळणे, वाहन चालवताना फोनवर न बोलणे किंवा मोबाईलचा वापर करणे टाळणे आदी प्रत्येक गोष्टी आपल्यातील वाहन चालकांनी पाळल्या पाहिजेत. पण, तरीही आपल्यातील बरेच जण सरार्स वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात आणि स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालतात. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होत आहे. यामध्ये दुचाकीवर बसलेला माणूस मोबाईलमध्ये रील शूट करत असतो व अचानक त्यांचा अपघात होतो.
व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशचा आहे. दोन पुरुष दुचाकीवरून प्रवास करताना दिसत आहेत. मागे बसलेला प्रवासी त्याच्या फोनमध्ये व्हिडीओ शूट करू लागतो. नंतर मोबाईलकडे दुचाकी चालकाचे सुद्धा लक्ष जाते आणि दुर्दैवाने, रेकॉर्डिंगमध्ये दिसण्यासाठी दुचाकी चालक सुद्धा समोर रस्त्याकडे न पाहता मोबाईलच्या दिशेने पाहू लागतो. नंतर अपेक्षेप्रमाणे, व्हिडीओ एका अपघाताच्या आवाजाने, ब्लर चित्रासह अचानक संपतो आणि प्रत्येक वाहन चालकाला स्पष्ट संदेश देऊन जातो. नक्की काय घडलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.
हेही वाचा…चिमुकल्याची पहिली मेट्रो सफर! आई मेट्रो चालवत आली अन्… VIDEO तून पाहा प्रेमळ कुटुंब
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या नजरेस पडला. विचित्र ड्रायव्हिंगच्या धोक्यांची आठवण करून देण्यासाठी, पोलिसांनी दुचाकी चालकाचा हा व्हिडीओ त्यांच्या अकाउंटवरून रिपोस्ट केला आहे. तसेच रहदारी सुरक्षेबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने वाहन चालवताना आपले डोळे, आपलं पूर्ण लक्ष रस्त्यावर असलं पाहिजे हे महत्त्व देखील अधोरेखित केलं आहे ; जे प्रत्येक वाहन चालकाने गाडी चालवताना लक्षात ठेवलं पाहिजे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ उत्तर प्रदेश पोलिसांच्या अधिकृत @uppolice इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘एक रील लाखो व्ह्यूज मिळवू शकतो. पण, ते लाखो किमतीच्या जीवनाची जागा घेऊ शकत नाही’ ; अशी कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिली आहे. तसेच उत्तर प्रदेशचे पोलीस नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात. वाहतूक नियमांचे पालन करणे, सायबर फसवणुकीपासून स्वतःला सुरक्षित ठेवणे यासह विविध समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात.