बस, रेल्वेमध्ये प्रवास करताना तुम्ही अनेकदा भांडण झालेलं पाहिलं असेल.लोकलमध्ये घडणारे अनेक किस्से तुम्ही आतापर्यंत एकले असतील. यातील लोकलमधली भांडणं तर वर्ड फेमस आहेत. पण अशी भांडणं फक्त लोकलमध्येच होतात, असं नाही… तर ती विमानातही होतात. तुम्हाला खरं वाटणार नाही, पण अश्या विमानातल्या भांडणांचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या वादाचा व्हिडिओही व्हायरल झालाय. गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवासात मारामारी, शिवीगाळ होण्याच्या घटना वाढल्या आहेत. आता असाच एक वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका प्रवाशानं फ्लाइट अटेंडंटला धक्काबुक्की केल्याचं सांगितलं जात आहे. तिथे उपस्थित असलेल्या फ्लाइट अटेंडंटने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा लोविन्सला राग अनावर झाला आणि त्याने फ्लाइट अटेंडंटला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर लगेचच प्रवाशाने इमर्जन्सी एक्झिटच्या दिशेने धाव घेतली आणि गेटही उघडलं. मात्र, फ्लाइट अटेंडंट आणि प्रवाशांनी मोठ्या प्रयत्नांनी त्याला सुखरूप परत आणलं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Viral video: चालत्या बसमध्ये अशी चढली तरुणी, सीट मिळवण्यासाठी जीवघेणा स्टंट
प्रकरण असं होतं की त्याला आणि त्याच्या पत्नीला त्यांना मिळालेल्या सीटवरुन उठवून दुसऱ्या जागेवर जाण्यास सांगण्यात आलं होतं. कोडी बेंजामिन लोविन्स नावाच्या प्रवाशाने आपत्कालीन एक्झिट गेटमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला.