Lion attack viral video: आपण सर्वांनी प्राणीसंग्रहालयांमध्ये पिंजऱ्याच्या आत बंद असलेले वाघ, सिंह आणि बिबट्या असे हिंस्त्र प्राणी पाहिले असतील. मात्र हेच प्राणी जर अचानक समोर आले तर कोणाचीही अवस्था खराब होईल. मात्र, हे प्राणी पिंजऱ्यात बंद असताना काही लोक त्यांच्याजवळ जात त्यांच्यासोबत मस्ती करण्याचा आणि या प्राण्यांची खोड काढण्याचा प्रयत्न करत असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती प्राणी संग्रहालयात सिंह बघताच त्याला त्रास देण्यास सुरुवात करतो.
दक्षिण आफ्रिकेत एका व्यक्तीने देवाच्या नावाखाली जे काही केलं ते सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारं होतं. सिंहासोबत पंगा घेणं या व्यक्तीला चांगलंच महागात पडतं. काही क्षणातच त्याला कर्माचं फळ मिळतं. हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की प्राणीसंग्रहालयात गेलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यात काहीतरी येतं आणि सिंहाला बंद पिंजऱ्यात पाहून तो त्याच्याजवळ पोहोचतो. यानंतर हा व्यक्ती पिंजऱ्याच्या आत आत जातो आणि सिंहाची खोड करण्याचा प्रयत्न करू लागतो.
देवाच्या नावाखाली प्राण्यांना त्रास
कधी सिंहाचा कान खेचत आहे, तर कधी त्यांच्या तोंडात हात टाकत आहे. आफ्रिकेत पादरी अनेकदा ब्रेनवॉश कऱण्यासाठी अशा प्रकारची कृत्यं करत असतात. आपल्यावर देवाचा आशीर्वाद असून, आपल्याकडे अशी शक्ती आहे जी सर्वसामान्य व्यक्तीकडे नाही हे सिद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण पादरी डॅनियलने जे काही केलं, ते सर्वात धोकादायक होतं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> अतिशहाणपणा नडला! इतका भीषण अपघात की गाडी उडून थेट दुसऱ्याच्या अंगावर पडली, VIDEO पाहून उडेल थरकाप
बाजूला असलेली व्यक्ती ही घटना कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करत असते. या चित्तथरारक व्हिडीओला प्रचंड प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक यूजर्सनी कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोक हा व्हायरल व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.