आई वडील हे मुलांच्या लहानपणापासून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम बनवतात. उतार वयात मुलं आपला आधार व्हावा असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं असतं. मात्र, अनेकांवर अशी वेळ येती की वृद्ध माता पित्यांनाच आपल्या तरुण मुलाला आधार द्यावा लागतो. त्यात जर आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर संघर्ष आणखी वाढतो. अशाच एका हतबल आई वडिलांचा हॉस्पिटलमधील व्हिडीओ समोर आला आहे. अवघ्या दहा सेकंदाचा हा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हॉस्पिटलमधील भोंगळ कारभार –

 स्ट्रेचर न मिळाल्याने आई वडिलांनी तरुण लेकाला जमीनीवर फरफट हॉस्पीटलमध्ये नेले आहे. हैदराबादच्या निजामाबाद जनरल हॉस्पिटलमधील हा व्हिडिओ असल्याचे समजते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आई वडिल आपल्या ४० वर्षाच्या मुलाला घेवून निजामाबाद जनरल हॉस्पिटलमध्ये आले होते. मात्र, त्याच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले नाहीत. ते रात्रभर मुलाला घेवून वेटिंग एरियात थांबले होते.  सकाळी डॉक्टरांनी या वृद्ध आई वडिलांना मुलाला वॉर्डमध्ये घेवून जाण्यास सांगितले. मुलाला चालता येत नव्हते. यामुळे त्यांनी स्ट्रेचर अथवा व्हिलचेअर द्यावे अशी मागणी हॉस्पीटलकडे केली. मात्र, त्यांना  स्ट्रेचर अथवा व्हिलचेअर देण्यात आले नाही. यामुळे या  वृद्ध माता पित्यांनी मुलाला फरफटत वॉर्डमध्ये नेले. 

a tea seller from gujarat sings amazing song
गुजरातच्या चहावाल्याचं टॅलेंट एकदा पाहाच! चहापेक्षा कडक गातोय भाऊ; VIDEO होतोय व्हायरल
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
a Fitness Trainer wrote message on paati
VIDEO : “… तेव्हा वजन आपोआप कमी होईल.” फिटनेस ट्रेनरची पाटी चर्चेत, पाहा व्हायरल व्हिडीओ
dog and wolf Viral Video
‘शेवटी त्यानं मृत्यूला हरवलं…’ लांडग्याने युक्तीने करून घेतली कुत्र्याच्या तावडीतून सुटका; VIDEO पाहून व्हाल थक्क
Emotional video : when middle class boy go to the jnv hostel by leaving home
जेव्हा मध्यमवर्गीय घरातील मुलगा घर सोडून JNV च्या होस्टेलवर राहायला जातो; VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी
Girls' Stunning dance on Mahabharat tital song
‘महाभारत’च्या टायटल गाण्यावर थिरकल्या मुली, डान्स स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा
IPL 2025 Retention Rules Announced
IPL 2025 : चेन्नई सुपर किंग्जसाठी आनंदाची बातमी! ‘या’ नियमामुळे महेंद्रसिंग धोनीला ठेवता येणार कायम
Instagram Love Affair Case
‘तो ‘इन्स्टा’वरच छान दिसत होता’, मुलीने मुलाला नाकारलं; चिडलेल्या मुलानं मग ‘तिचा’ तसला व्हिडीओ केला व्हायरल

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Video: महाराष्ट्र भूषण पुरस्काराला गालबोट; मात्र पोलिसांकडून पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन

८ हजार पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. १ एप्रिल रोजी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. यावर अनेक कमेट्स देखील आल्या आहेत. हा फोटो शेअर करताना आरोग्य खात्याला देखील टॅग करण्यात आले होते. यानंतर आरोग्यमंत्री हरीश राव यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.