आई वडील हे मुलांच्या लहानपणापासून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम बनवतात. उतार वयात मुलं आपला आधार व्हावा असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं असतं. मात्र, अनेकांवर अशी वेळ येती की वृद्ध माता पित्यांनाच आपल्या तरुण मुलाला आधार द्यावा लागतो. त्यात जर आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर संघर्ष आणखी वाढतो. अशाच एका हतबल आई वडिलांचा हॉस्पिटलमधील व्हिडीओ समोर आला आहे. अवघ्या दहा सेकंदाचा हा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हॉस्पिटलमधील भोंगळ कारभार –

 स्ट्रेचर न मिळाल्याने आई वडिलांनी तरुण लेकाला जमीनीवर फरफट हॉस्पीटलमध्ये नेले आहे. हैदराबादच्या निजामाबाद जनरल हॉस्पिटलमधील हा व्हिडिओ असल्याचे समजते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, आई वडिल आपल्या ४० वर्षाच्या मुलाला घेवून निजामाबाद जनरल हॉस्पिटलमध्ये आले होते. मात्र, त्याच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले नाहीत. ते रात्रभर मुलाला घेवून वेटिंग एरियात थांबले होते.  सकाळी डॉक्टरांनी या वृद्ध आई वडिलांना मुलाला वॉर्डमध्ये घेवून जाण्यास सांगितले. मुलाला चालता येत नव्हते. यामुळे त्यांनी स्ट्रेचर अथवा व्हिलचेअर द्यावे अशी मागणी हॉस्पीटलकडे केली. मात्र, त्यांना  स्ट्रेचर अथवा व्हिलचेअर देण्यात आले नाही. यामुळे या  वृद्ध माता पित्यांनी मुलाला फरफटत वॉर्डमध्ये नेले. 

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – Video: महाराष्ट्र भूषण पुरस्काराला गालबोट; मात्र पोलिसांकडून पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन

८ हजार पेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. १ एप्रिल रोजी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. यावर अनेक कमेट्स देखील आल्या आहेत. हा फोटो शेअर करताना आरोग्य खात्याला देखील टॅग करण्यात आले होते. यानंतर आरोग्यमंत्री हरीश राव यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video patients who visit government hospitals in hyderabad dragged by his father and mother srk
Show comments