Tiger Viral Video: वाघ हा जंगलांचा राजा आहे असे आपल्याकडे मानले जाते. वाघ जंगलामध्ये असो वा पिंजऱ्यामध्ये त्याची दहशत आसपासच्या लोकांना अनुभवायला मिळते. वाघ अत्यंत देखणा प्राणी आहे. वाघाला जवळून पाहण्यासाठी त्याला पिंजऱ्यामध्ये ठेवावे लागते किंवा वाघांच्या अभयारण्यामध्ये पिंजऱ्याची गाडी घेऊन जावे लागते. प्राणी संग्रहालयामध्ये वाघ पाहायला मिळतात. या वाघांना लोकांशी कसे वागायचे वगैरे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षित वाघांच्या जवळ जाणे काहीसे सुरक्षित असते. पण तेव्हा सोबतीला सुरक्षा रक्षक असणे आवश्यक असते. प्राणी संग्रहालयात वाघाबरोबर फोटो काढत असताना अनेक गमती-जमती घडत असतात. अशाच एका विनोदी घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये दोन तरुण एका मोठ्या वाघाच्या जवळ बसून फोटो काढत असल्याचे पाहायला मिळते. त्या वाघाच्या गळ्यामध्ये दोरखंडदेखील दिसतो. वाघाचा नीट फोटो यावे यासाठी त्याचे तोंड कॅमेऱ्याकडे असणे आवश्यक असते. त्या पिंजऱ्याच्या बाजूला असलेली एक व्यक्ती वाघाने कॅमेऱ्याकडे पाहावे यासाठी त्याला काठी मारत असते. एक-दोन वेळा होणारा हा त्रास वाघ सहन करतो. पण वैतागून काठी मारणाऱ्या व्यक्तीकडे पाहून जोरात डरकाळी फोडतो. वाघाचा आवेश पाहून त्याच्यामागे उभे असलेले तरुण इतके घाबरतात की, ते पिंजऱ्यातून बाहेर पळू जातात. त्यातील एकजण तर लांब गेल्यावर पिंजऱ्यातील वाघाला घाबरुन नमस्कार करण्यासाठी खाली वाकतो. तर दुसरा जोराजोरात ओरडत लांब जाताना दिसतो.

two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Virat Kohli Shouts At Mohammed Siraj who is Talking to Marnus Labuschagne Said Dont Talk To Them Laughingly Video
VIDEO: “यांच्याबरोबर हसत बोलू नकोस…”, लबूशेनबरोबर बोलताना पाहून विराट कोहली सिराजला ओरडला, मैदानात नेमकं काय घडलं?
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
Deepika Ranveer reveals daughter Dua face
Video: रणवीर सिंह-दीपिका पादुकोणने दाखवला लेकीचा चेहरा, खास ‘या’ लोकांसाठी ठेवली पार्टी
a child girl cried as young girl asked questions to her
VIDEO : तरुणीचा प्रश्न ऐकताच चिमुकली ढसा ढसा रडायला लागली.. नेटकरी म्हणाले, “थेट काळजावर..”
Aishwarya Rai And Abhishek Bachchan attends aaradhya school event
Video : लेकीच्या शाळेत जोडीने पोहोचले ऐश्वर्या राय व अभिषेक बच्चन! सोबतीला होते ‘बिग बी’; ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

आईशी Prank करायला गेली आणि तोल गेल्याने भिंतीवर जोरात आपटली, तरुणीचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

हा विनोदी व्हिडीओ ट्विटरवर @HasnaZarooriHai या अकाउंटने शेअर केला आहे. फक्त २४ सेकंदांचा हा व्हिडीओ ८० हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. दीड हजाराहून जास्त यूजर्सनी व्हिडीओ लाईक केला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ त्यांच्या मित्रांना शेअर देखील केला आहे. लोकांनी कमेंट करत या आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने ‘वाघ अरे तुम्ही का पळताय मी तुम्हाला काही बोललो नाहीये’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या यूजरने ‘त्यांनी सुसु तर केली नाही ना’ असे म्हटले आहे.

Story img Loader