जगाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खाल्ले जाते. काही देशांमध्ये असे पदार्थ आणि प्राणी खाल्ले जातात, जे पाहूनच आपल्याला किळस येते. जगभरात लोक अनेक विचित्र पदार्थ अगदी चवीनं खातात. सध्या अशाच एका पदार्थाचा व्हिडीओ समोर आला आहे. आतापर्यंत तुम्ही वेगवेगळे बर्गर खाल्ले असतील. चिकन बर्गर, व्हेज बर्गर, वेगवेगळ्या चवींचे बर्गर तुम्ही खाल्ले असतील. मात्र कधी ‘मॉस्किटो बर्गर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या डासांपासून बनवलेला बर्गर तुम्ही कधी ऐकला आहे का? नाही ना..पण एका देशातील लोक डासांपासून बनवलेले बर्गर मोठ्या उत्साहाने खातात. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे लोक डासांपासून बनवलेला बर्गर खाताना पाहून तुम्हालाही किळस वाटेल.
आफ्रिकेतील लेक व्हिक्टोरिया भागातील लोक डासांपासून बनवलेला हा बर्गर खातात. तुम्हाला माहिती आहेच की डासांमुळे अनेक प्रकारचे आजार होतात. डासांच्या विविध प्रजातीही आढळतात. प्रत्येक प्रजाती विशिष्ट प्रकारच्या रोगाशी संबंधित आहे. तरीही हे लोक हा बर्गर अगदी चवीनं खातात. हा ‘मॉस्किटो बर्गर’ खाणाऱ्या लोकांचा असा विश्वास आहे की डास खाल्ल्याने शरीरातील अनेक आवश्यक पोषक तत्वांची कमतरता पूर्ण होते. दरवर्षी पावसाळ्यात या डासांची संख्या येथे वाढते. ते मोठ्या कळपात उडतात. त्यांचा गट इतका मोठा असतो की ते कोणत्याही व्यक्तीला जखमी करू शकतात. तरीही हे लोक त्यांची शिकार करण्यास घाबरत नाहीत. हे खाल्ल्याने प्रथिने मिळतात असा त्यांचा विश्वास आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, त्यांना पकडण्यासाठी भांडी आणि तवा यांसारखी साधने वापरली जातात. डास गोळा केल्यानंतर, ते मॅश केले जातात आणि पॅटीजसारखा आकार दिला जातो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> अंत्यसंस्कारात वाजला डीजे; मृतदेहाला खांदा देणारे लोक मृतदेहासोबतच नाचू लागले, पहा धक्कादायक VIDEO
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @real.unique.planet या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.